श्रीरामपूर(बाबासाहेब चेडे) - नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघ विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करतो. आधी कर्तव्य नंतर हक्कासाठी लढतो. ही बाब शिक्षण क्षेत्रासाठी चांगली आहे. राज्य संघाचे अध्यक्ष अर्जून कोळी यांनी दिल्ली दौरा आयोजित केला होता. यात राज्यातील ऐंशी शिक्षक स्वखर्चाने सहभागी झाले होते. त्याचा अहवाल अनिल पवार श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी तथा प्रशासकीय अधिकारी नगरपालिका श्रीरामपूर यांना देण्यात आला, त्यावेळी बोलत होते. अहवालाबाबत मी व मुख्याधिकारी चर्चा करून नगरपालिका शाळांसाठी काय करता येईल त्याबाबत निर्णय घेऊ.
यावेळी नगरपालिकेचा प्रशासकीय पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा अहमदनगर नगरपालिका महानगरपालिका शिक्षक संघाचे वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीरामपूर नगरपालिका शिक्षण मंडळाचा आठ महिन्याचा १०% थकित पगार मिळण्यासाठी आपण प्रयत्न करावे याबाबत निवेदन देण्यात आले.
यावेळी राज्य संघाचे राज्य संघटक, नवनाथ अकोलकर, राज्य सदस्य विजय शेळके, जिल्हा अध्यक्ष फारुकभाई शाह, जिल्हा संपर्कप्रमुख अजय शिंदे, शहर अध्यक्षा सौ. रजनी कर्डीले, सदिच्छा मंडळ अध्यक्षा सौ. प्रतिभा जयकर, जिल्हा सल्लागार ताराचंद पगारे, जिल्हा सदस्य सचीन शिंदे, मुख्याध्यापिका सौ. कांचन मुसळे, श्रीमती कृष्णाताई थोरे, सदिच्छा मंडळ कार्याध्यक्ष श्रीमती लता औटी, संघ कोषाध्यक्ष सौ योगिता हुडे, सहचिटणीस सौ कल्पना जगताप, उपाध्यक्षा श्रीमती वर्षा वाकचौरे आदि उपस्थित होते. प्रास्ताविक राज्य संघटक नवनाथ अकोलकर सर यांनी केले तर आभार फारुकभाई शाह यांनी मानले.
0 टिप्पण्या