काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त लोणी काळभोर परिसरात विविध सामाजिक उपक्रम

अहमदनगर/ जावेद शेख : ग्रीन फाऊंडेशन मार्गदर्शक, पर्यावरण प्रेमी प्रकाश काळभोर यांच्या वाढदिवसानिमित्त लोणी काळभोर तिर्थक्षेत्र रामदरा कोळपे वस्ती ऑक्सिजन पॉईट क्र 3 येथे 551 जंगली झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले.

रायगड किल्ले संवर्धन संस्थेस व आदिवासी भागातील विद्यार्थींना शालेय साहित्य व महापुरुषांवर असलेले आदर्श पुस्तके वाटप करण्यात आले. ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेस 551 झाडे वाढदिवसानिमित्त देण्यात आली. तसेच वाढदिवसानिमित्त स्वामी समर्थ मंदिर सोरतापवाडी येथे अन्नधान्य कार्यक्रम करण्यात आला. प्रकाश काळभोर यांनी वाढदिवसानिमित्त स्वतः रक्तदान करून एक आगळा वेगळा वाढदिवस साजरा केला आहे. संबंध पंचक्रोशीत केलेल्या उपक्रमामुळे प्रकाश काळभोर यांचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे. सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्या निस्वार्थ भावनेतून समाजाची सेवा करणारे श्री काळभोर यांनी आणखीन जोमाने कार्य करण्यासाठी अमित जगताप यांनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी योगिताताई घुले, युवराज चौधरी, रोहीत गुंजाळ, संतोष मगर, नितीन पारवे, आकाश काळभोर, मकरंद गायकवाड, महेश खुळपे, अमित जगताप, सुभाष विरकर, पांडुरंग केसकर, बिरूदेव भास्कर, बाबासाहेब यादव, किरण बाचकर, आकाश काळभोर, मकरंद गायकवाड यांच्यासह मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. समाजाने हे लक्षात घेणे गरजेचे असून प्रत्येक कुटुंबातील सदस्याने वृक्षांची लागवड करून आपल्या लेकरा प्रमाणे संवर्धन करण्याची गरज आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यापुढेही असेच समाजोपयोगी कार्यक्रम हाती घेण्यात येतील असे प्रतिपादन प्रकाश काळभोर यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या