अहमदनगर/ जावेद शेख : राहुरी तालूक्यातील बारागांव नांदुर येथील माजी सरपंच प्रभाकर रेवनाथ गाडे यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड झाली आहे.
प्रभाकर गाडे हे प्रगतिशील शेतकरी आहेत. गांव, वाड्यातील विकासासाठी त्यांनी गेली काही वर्षापासुन ते ग्रामपंचायत सदस्य आणि मार्गदर्शक म्हणून काम पाहत आहे. वृक्ष मित्र म्हणून गाडे यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे. गांव, तालुक्यातील, मनमिळावू, अभ्यासू, एकनिष्ठपणे काम करणारे कार्यकर्त म्हणून त्यांची ओळख आहे.
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे घराचे विश्वासू, एकनिष्ठ कार्यकर्त असल्याने त्यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्याबद्दल त्यांचे गांव, तालूका, जिल्ह्यात अभिनंदन केले जात आहे.
0 टिप्पण्या