श्रीरामपूर / बाबासाहेब चेडे : उंदीरगाव ते माळेवाडी रोड पिण्याचे पाईप लाईन पंचायत समिती व ग्रामपंचायत उंदीरगाव यांच्या १५ व्या वित्त आयोगानुसार ४ लक्ष ५० हजार, खैरी रोड बंदिस्त गटार व पांढरी वस्ती ३ लाख ५० हजार ग्रामपंचायत १४ वा वित्त आयोगमधून तसेच पंचायत समिती सदस्य यांच्या निधीतून खर्डे वस्ती खडीकरण व पांढरी वस्ती खडीकरण अंदाजे ३ लाख ५० हजार, उंदीरगाव जि प प्राथमिक शाळेला कंपाउंड, ग्रा.प.१४ व वित्त आयोगातून २ लाख रु, तसेच बांद्रेवस्ती खडीकरण ५ लाख रु व पंचायत समिती सदस्य निधीतून मुरमीकरण या सर्व विविध विकास कामाचा शुभारंभ अशोक कारखाना माजी चेअरमन सुरेश पा.गलांडे यांच्या हस्ते करण्यात आला. ठेकेदाराने गुणवत्तेप्रमाणे व एस्टीमेट प्रमाणे चांगले काम करून या गावचा विकास कामात सहकार्य करावे, असे आवाहन सुरेश पा.गलांडे यांनी यावेळी केले.
या प्रसंगी अशोक कारखाना संचालक विरेश गलांडे, दुध संघ संचालक राजेंद्र पाउलबुद्धे, म.जि प.सदस्य बाळासाहेब नाईक, सरपंच सुभाष बोधक, उपसरपंच रमेश गायके, ग्रामविकास अधिकारी हितेश ढूमणे, राजीव गिर्हे, बबनराव नाईक, लक्ष्मणराव सरोदे, बाळासाहेब राउत, अशोकराव गुळवे, बाळासाहेब रोकडे, बाळासाहेब आढाव, अशोक पवार, विजय गिर्हे, अशोक मोरे, चंद्रकांत गायकवाड, चित्रसेन गलांडे, ग्रा.प.सदस्य प्रकाश ताके, दीपक बोधक, रवींद्र गायकवाड, अरुण चित्ते, विशाल शिंदे, सचिन गायकवाड, अनिकेत कुऱ्हाडे, शांताराम गायकवाड, सुभाष गायकवाड, सागर शिंदे, संजय काळे आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.
0 टिप्पण्या