पेमगिरीच्या आशुतोष भूतांबरे यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने स्तुत्य उपक्रम

संगमनेर /बाळासाहेब भोर : तालुक्यातील पेमगिरी येथील आशुतोष भूतांबरे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरदरावाडी येथील विद्यार्थ्यांना आपल्या स्वखर्चातुन वही, पेन, पेन्सिल, खोडरबर या शालेय उपयोगी वस्तूंचे वाटप केले आहे.

श्री भूतांबरे यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी अनावश्यक खर्चास फाटा देऊन केलेले हे कार्य खरोखरच कौतुकास्पद व आत्ताच्या पिढीसमोर आदर्श निर्माण करणारे आहे. आज आपण समाजात बघतो की वाढदिवस म्हटलं की, बॅनर, फटाके, डीजे, पार्ट्या अशा प्रकारचा अनावश्यक खर्च होत असतो. परंतु आज प्रत्येकाने मदतीची भावना ठेवणं खुप महत्वाचं आहे. मदत ही मदतच असते ती छोटी किंवा मोठी असूच शकत नाही. फक्त आपला हेतू शुद्ध असला पाहिजे.

श्री भूतांबरे यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी शालेय विद्यार्थांना दिलेली भेट नक्कीच अनोखी आहे. कारण उद्या तीच मुलं मोठ्या पदावर गेल्यानंतर या शाळेतील विद्यार्थ्यांना मदत करू शकतात की आपल्यालाही आपण शाळेत असताना कुणीतरी मदत केली होती म्हणून शेवटी संस्कार हाच विद्यार्थ्यांचा खरा दागिना आहे. या शालेय वस्तूंच्या वाटपावेळी त्या निरागस चेहऱ्यांवर समाधानाचे भाव दिसत होते.

याप्रसंगी आशुतोष भूतांबरे यांच्यासमवेत संकेत धुमाळ, राजगुरू गपले, संकेत कोल्हे, सुशांत गिते, संकेत कासार, अक्षय डुबे, प्रीतम शेटे, प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या