◾पोरगाव येथील शंकर निळ यांचे पोलिस अधीक्षक यांना निवेदनातून मागणी
◾१२ जानेवारीला बिडकीन पोलिस ठाण्यासमोर आत्मदहनाचा इशारा
पैठण : जागेच्या वादातून मारहाण करुन जामीनावर सुटलेल्या आरोपींकडून वारंवार मानसिक त्रास व जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याने भयभीत झालेल्या जागा मालकाने पोलिस अधीक्षक यांच्याकडे आरोपीवर त्वरित कठोर कारवाई करा नसता १२ जानेवारी रोजी बिडकीन पोलिस ठाण्यासमोर आत्मदहन करणार, असा इशारा पोरगाव येथील शंकर निळ यांनी दिला आहे.
पैठण तालुक्यातील पोरगाव येथील शंकर निळ यांनी काही दिवसांपूर्वी गावातच तीन गुंठे जागा खरेदी केली होती. या जागेवरून गावातील संजय रामनाथ निळ, दत्ता रामनाथ निळ, कृष्णा रामनाथ निळ, सोमिनाथ भाऊसाहेब गोरे, लक्ष्मण दत्ता निळ यांच्यासोबत वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यात शंकर निळ हे जखमी झाले होते. याप्रकरणी सदर चार जणांविरोधात बिडकीन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होवून आरोपींना अटक झाली होती. त्यानंतर त्यांची जामीनावर सुटका झाली. बाहेर आल्यानंतरही पुन्हा जागेवरून वाद निर्माण करत स्वतः ची जागा असूनही जागा मालकाला जाग्यावर जाण्यास अडथळा निर्माण करणे. जागा हडप करण्याच्या उद्देशाने कटकारस्थान करून खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न तसेच एवढेच तु जाग्यावर आल्यास तुला जिवंत जाळू अशा धमक्या सुद्धा देत असल्याचे शंकर निळ यांनी निवेदनात म्हटले आहे.
शंकर निळ यांनी ही जागा व्यवसायासाठी खरेदी केली होती. या जाग्यावर त्यांनी पत्राचे शेड उभारले आहे. आरोपी या शेडचेही नुकसान करत असून या अशा वारंवार करत असलेल्या त्रासदायक कृत्यामुळे त्रासाला वैतागून शंकर निळ यांनी पोलिस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे सदर आरोपीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. जर त्वरित कारवाई केली नाही तर येणाऱ्या १२ डिसेंबरला बिडकीन पोलिस ठाण्यासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा निळ यांनी निवेदनातून दिला आहे.
0 टिप्पण्या