अहमदनगर/ जावेद शेख : राहुरी तालुक्यातील कानडगांव पंचक्रोशीचे आराध्य दैवत शेरखावली बाबांचा यात्रोत्सव सालाबादप्रमाणे याही वर्षी संदल शनिवार दि. १५ जानेवारी रोजी व रविवार व सोमवार १६ व १७ जानेवारी या कालावधीत यात्रा उत्सव साजरा होत आहे. पंरतु या वर्षीचा यात्रोत्सव कोरोनामुळे साधेपणाने पार पडणार आहे. यात्रेमध्ये दुकानदारांना दुकाने लावण्यास बंदी घालण्यात आली आहे. सोशल डिस्टसिंग व शासनाचे सर्व नियम पाळून बाबांच्या दर्शनासाठी येणारे भाविक भक्तांना मंदिर खुले राहिल.
कानडगांव येथील शेरखावली बाबा हे एक जागृत देवस्थान असुन ग्रामीण भागातील असुन ही हा यात्रा उत्सव जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. बाबांच्या दर्शनासाठी जिल्ह्यातुन व पर जिल्ह्यातील अनेक भाविक दरवर्षी मोठ्या आंनदाने येत असतात. परंतु यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक गांवाच्या यात्रा रद्द करण्यात आल्या आहे. त्याच धर्तीवर यावर्षीचा शेरखावली बाबाचा यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे दरवर्षी येणारे दुकानदार हलवाई, कटलरी व्यावसायिक यांनी यात्रेत येऊन दुकाने लावण्यास देवस्थानच्या कमिटीच्या वतीने बंदी घातली आहे.
दरवर्षी यात्रेत होणारा तमाशा व नामवंत कुस्त्यांचा हगामा रद्द करण्यात आला आहे. मात्र शेरखावली बाबांच्या दर्शनासाठी व धार्मिक विधिसाठी येणारे भाविक भक्तांना सोशल डिस्टसिंग चे पालन करुन दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती देवस्थान कमिटीच्या वतीने देण्यात आली आहे.
0 टिप्पण्या