अहमदनगर/ जावेद शेख : वेळ विनाकारण व्यर्थ घालवू नका, जा आणि शिक्षण प्राप्त करा हा संदेश स्त्री शिक्षणाच्या आद्य क्रांतिकारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना दिला. या संदेशामुळे भारतातील अनेक जातीधर्मातील स्त्रियांना शिक्षणाची दारे उघडी झाली व स्त्रियांना शिक्षण घेता आले असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय हळगाव येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. मिलिंद अहिरे बोलत होते.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात डॉ. अहिरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सखेचंद अनारसे यांनी सावित्रीबाई फुले यांचे बद्दल आपले विचार मांडले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे डॉ. चारुदत्त चौधरी, प्रा. कीर्ती भांगरे, डॉ. प्रेरणा भोसले, डॉ. दत्तात्रेय पाचारणे, डॉ. बाळासाहेब काकड, प्रा. आत्तार, सौ.वैशाली पोदे, सौ. ज्योती सासवडे उपस्थित होत्या.
0 टिप्पण्या