माध्यमिक शिक्षक सोसायटी सभासदांना १८ लाखापर्यंत कर्ज देणार- सुर्यकांत डावखर

श्रीरामपूर [बाबासाहेब चेडे] : माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटी पुरोगामी सहकार मंडळाचे नेते प्रा.भाऊसाहेब कचरे यांच्या नेतृत्वाखाली सभासद उपयोगी काम करीत असून प्रत्येक सभासदाला १८ लाख रु.पर्यंत कर्ज देण्यात येणार असून कर्जावरील व्याजदर साडेसात रुपयावरून सात टक्के करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जेष्ठ संचालक सुर्यकांत डावखर यांनी केले. ते सेवानिवृत्त कर्मचारी कृतज्ञता निधी, भाग्यलक्ष्मी कन्यादान योजना प्रदान गुणवंत विद्यार्थी सन्मान समारंभप्रसंगी बोलत होते.

डावखर म्हणाले सोसायटीकडे ७०७ कोटी रु.च्या ठेवी असून ८३३ रु.चे कर्जवाटप करण्यात आले आहे. ७५ कोटी रु.ची गुंतवणूक करण्यात आली असून ९७ कोटी रु.भाग भांडवल आहे. प्रमुख अतिथी नवनाथ कुताळ म्हणाले शिक्षण क्षेत्राल विविध शैक्षणिक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी अधिकारी व कर्मचारी यांची समन्वय समिती स्थापन करण्याची गरज आहे. तरच लवकर प्रश्न मार्गी लागतील. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करू. अध्यक्षस्थानी प्रा.ज्ञानेश गवले तर प्रमुख अतिथी नवनाथ कुताळ हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेश गवले म्हणाले की सर्व आरोग्य आबाधित ठेवून शिक्षक सेवानिवृत्त होतो. हे भाग्य आहे. शिक्षक जे विद्यार्थी घडविण्याचे पवित्र कार्य करतात त्याचे मूल्यमापन होऊ शकत नाही. अनेकांनी पेन्शनरची व्यथा मांडली. मृत सभासदांची कर्ज माफ करणारी ही एकमेव संस्था आहे. सभासदांचे देणे असेल ते दिले जाते. 

यावेळी मुख्याध्यापक संघटना अध्यक्ष जाकीर सय्यद, सचिव सुनील म्हसे, बबनराव लबडे, खा.गोविंदराव आदिक, ग्रा.शिक्षण सहकारी पतसंस्था चेअरमन बाळासाहेब बनकर, व्हा.चेअरमन अशोक कटारे, अर्जुन डुकरे, प्रा.अरविंद नवले, अनिल तायडे, ज्ञानेश्वर येसेकर, अरुण कुऱ्हे, गुलाब गाडेकर, बाळकृष्ण तऱ्हाळ, राजेंद्र टेकावडे, बाबासाहेब पटारे, सुधीर भागडे, कल्याण होन, साधना शेळके, अरुण वेताळ, दिलीप देसाई, सुनील ओहोळ, व्यवस्थापक विजय गवळी, सागर रोकडे, गणेश शिंपी आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या