भगवान श्रीकृष्णांनी गोकुळात केलेल्या लिला अपरंपार- देशमुख महाराज

काल्याच्या किर्तन प्रसंगी शिवाजी महाराज देशमुख

आरडगाव/ राजेंद्र आढाव : भगवान श्रीकृष्णांनी गोकुळात केलेल्या लिला अपरंपार आहे. त्यांनी बालपणी अनेक प्रकारच्या चो-या केल्या, दहीदुधा बरोबरच गवळणीच्या चित्ताची चोरी केली, असे श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट नेवासाचे अध्यक्ष ह.भ.प. महंत गुरुवर्य शिवाजी महाराज देशमुख किर्तन प्रसंगी बोलत होते.

राहुरी तालुक्यातील केंदळ बुद्रुक येथे सालाबाद प्रमाणे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 49 वे सोमवार दि. 27 डिसेंबर ते सोमवार दि. 3 जानेवारी या कालावधीत संपन्न झाला. या सप्ताहाच्या काळात श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी गाथा वाचन, काकडा आरती, हरिपाठ हरिपाठ, कीर्तन महोत्सव, दिपप्रज्वलन, दिंडी प्रदक्षणा अशा विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या सप्ताहात माऊली महाराज मोरे, ज्ञानेश्वर महाराज कोठुळे, महाराज डॉ. विकासनंदजी महाराज मिसाळ, सुरेश महाराज वारके, भागवताचार्य महेशजी महाराज खाटेकर, कंठाळे महाराज आदींची कीर्तन झाली. त्यांना सातसंगत गायनाचार्य बाळासाहेब महाराज पवार, काशिनाथ महाराज टेकाळेे, मृदंगाचार्य महेश महाराज तारडेे, योगेश महाराज तारडे, शुभम महाराज भांड यांनी केली.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट नेवासाचे अध्यक्ष शिवाजी महाराज देशमुख यांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या