अहमदनगर/ जावेद शेख : अखिल भारतीय मराठा महासंघ दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा, मराठा भूषण पुरस्काराचे वितरण तसेच सार्वजनिक वाचनालयाचा उद्घाटन समारंभ महाराष्ट्र राज्याचे कृषीमंत्री ना. दादासाहेब भुसे यांच्या हस्ते व मा. संरक्षण राज्यमंत्री खासदार सुभाष भामरे, मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.आमदार नरेंद्रजी पाटील यांचे हस्ते वाचनालयाचे उद्घाटन तर, मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी कोंढरे यांचे हस्ते दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न झाला.
नाशिक मराठा विद्याप्रसारक समाज अध्यक्ष डॉ तुषार शेवाळे, बंडू काका बच्छाव, सुरेश नाना निकम, ॲड शिशिरजी हिरे, अरुण देवरे यांच्यासह योगेश नाटकर, क्रीडा अध्यक्ष अशोक दुधारे, महाराष्ट्र क्रीडा संघटक विष्णु आहिरे, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव, नाशिक जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बनकर, शहराध्यक्ष संजय फडोळ, नाशिक महिला अध्यक्ष अस्मिता देशमाने, धुळे जिल्हाध्यक्ष जगनभाऊ टाकटे व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मराठा समाजातील प्रतिभावंत व्यक्तींचा समाजकारण, राजकारण, शिक्षण, आरोग्य, उद्योग, रोजगार, महीला सबलीकरण, अंधश्रद्धा निर्मूलन, प्रशासकीय अधिकारी अशा अनेक क्षेत्रात काम करणाऱ्यांना सन्मान मराठा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी मराठा महासंघाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, समाज बांधव व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रम यशस्वितेसाठी अखिल भारतीय मराठा महासंघ दाभाडी शहर शाखेचे सर्व पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. ऐ.के.पाटील सर यांनी तर सूत्रसंचालन अमोल निकम तर आभार सुरेश पवार यांनी केले. नवीन महिला तसेच युवा तालुका पदाधिकारी नेमण्यात आलेत.
यावेळी मंगेश निकम, रावसाहेब निकम, पूनाजी निकम, नामदेव आहिरे, कारभारी निकम, दिनेश महाले, घनश्याम निकम, दीपक निकम, भारत निकम, आकु निकम, दिपू निकम, अजय निकम, पुरुषोत्तम निकम, रोहित निकम, दिगंबर निकम, गणेश साठे, प्रशांत चव्हाण, अनिल निकम, सुनिल सोनवणे, यश आहीरे, सुनिल निकम, संदीप पगारे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या