खुळे, तोडमल यांचा ग्रामस्थांकडून सत्कार

राहुरी शहर/ अशोक मंडलिक : वळण येथे सेवानिवृत्त संघटनेच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी पर्वतराव खुळे गुरुजी, माध्यमिक सोसायटीच्या तज्ञ संचालकपदी उत्तमराव खुळे व भाजपा जिल्हा शिक्षक आघाडीच्या अध्यक्षपदी साहेबराव तोडमल यांची निवड झाल्याबद्दल वळण ग्रामपंचायत, युवासेना, सुभाष पाटील मित्र मंडळ व वळण ग्रामस्थ यांचे वतीने सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी पर्वतराव खुळे गुरुजी, उत्तमराव खुळे, साहेबराव तोडमल, पत्रकार प्रभाकर मकासरे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी सरपंच सुरेश मकासरे, उपसरपंच एकनाथ खुळे, युवासेना उपप्रमुख धनंजय आढाव, माजी सरपंच अशोकराव कुलट, माजी सरपंच सुदामराव आढाव, ग्रा.प.सदस्य विजय आढाव, विजय बनकर, भानाभाऊ खुळे, पत्रकार वसंतराव आढाव, पत्रकार प्रभाकर मकासरे, विजय ठुबे आदी उपस्थित होते. युवासेना तालुका उपप्रमुख धनंजय आढाव यांनी प्रास्ताविक केले तर आभार ग्रा.प सदस्य विजय आढाव यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या