राहुरी शहर/ अशोक मंडलिक : सावित्रीबाई फुले यांनी जिवनात संघर्ष करत महिलांना शिक्षीत केले. त्याकाळी महिलांसाठी शिक्षणाचे कार्य करणे कठीण असताना हतबल न होता, ते तडीस नेले. त्यामुळे सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून महिला स्वयं सहाय्यता समूहांनी वाटचाल करावी, असे सौ. खराडे मॅडम यांनी प्रतिपादन केले.
कोंढवड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापिका सौ. खराडे मॅडम बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच सौ. आशादेवी म्हसे होत्या तर दिलीप म्हसे, क्रांतीसेनेचे संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील हिवाळे, गोरक्षनाथ म्हसे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत म्हसे, शिवाजीराव औटी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी मुख्याध्यापिका सौ खराडे मॅडम यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. याप्रसंगी चंदणे मॅडम, राधिका म्हसे, मंगल म्हसे, उमा म्हसे तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी भाषणे केली. काही मुलींनी सावित्रीबाई ची वेशभूषा केली होती. शाळेतील मुलांना शिवाजीराव औटी यांनी लेखन साहित्य म्हणून पेन वाटप केले.
यावेळी रणजित पवार, रोहिणी म्हसे, अंगणवाडी सेविका मंगल म्हसे, नंदिनी म्हसे, शांताबाई म्हसे, सरिता म्हसे, चंद्रकला म्हसे, जिजाबाई म्हसे, आशाबाई म्हसे, रेखा म्हसे, भारती पवार, जयश्री म्हसे, ज्योती म्हसे आदी स्वयंसहाय्यता समूहाच्या महिला उपस्थित होत्या.
0 टिप्पण्या