अहमदनगर/ जावेद शेख : अखिल भारतीय फार्मासिस्ट असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य पदी फार्मासिस्ट महाराष्ट्र भूषण लोकनेते सचिन भाऊसाहेब गुलदगड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
फार्मासिस्ट क्षेत्रांमधील फार्मासिस्ट वर होणार अन्याय दूर व्हावा व त्यांना न्याय व हक्क कसा मिळवता येईल यासाठी त्यांनी व संपूर्ण महाराष्ट्रभर कार्य केले आहे. तसेच कोरोना काळामध्ये सामाजिक बांधिलकी जपत जीवाची पर्वा न करता यआपले कर्तव्य बजावले आहे. त्याचप्रमाणे सॅनिटायझर वाटप माक्स वाटप, अन्नदान रुग्णालयात रुग्णांना ऍडमिट करणे त्यांचे हे कार्य बघून संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता खराटे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. पंकज चौधरी, प्रदेश सचिव रोहित वाघ, राज्य कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर पायघन यांच्या शिफारशी नुसार व सर्वांच्या एकमताने त्यांची निवड करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल विविध शैक्षणिक, अध्यात्मिक व राजकीय क्षेत्रामधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहेत. तसेच संघटनेचे विदर्भ विभाग प्रमुख फार्मासिस्ट योगेश मुंडे, विदर्भ विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर पायघन, प्रदेश कार्याध्यक्ष नासीर पठाण प्रदेश कोषाध्यक्ष राम घोटकर, प्रदेश सहसचिव महादेव मुंडे, प्रदेश प्रवक्ते हनुमान गरुड, प्रवक्ते बाळ राहुल पारखे, खानदेश विभाग अध्यक्ष प्रा. सुशील महाराज, राज्य कार्यकारिणी सदस्य मुंबई विभाग अध्यक्ष हर्षराज आहिरे, विदर्भ विभाग कार्यकारणी सदस्य प्रा. वैभव नरवाडे, प्रा विशाल रावसे मराठवाडा विभाग कार्यकारणी सदस्य, राज्य कार्यकारिणी सदस्य यांनी पण त्यांचे अभिनंदन केले आहे व त्यांच्या कडून येणाऱ्या काळामध्ये पूर्ण महाराष्ट्र मध्ये फार्मासिस्टच्या येणार्या विविध अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहतील अशी आशा व्यक्त केली.
0 टिप्पण्या