अहमदनगर/ जावेद शेख : दि. ३ जानेवारी २०२२ क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचा जन्मदिवस यानिमित्ताने राहुरी तालुक्यातील सुगी फौंडेशन व महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियन, असंघटीत कष्टकरी महीला, यांच्या वतीने राहुरीत मुलनमाथा येथे मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली.
सावित्रीबाई यांची क्रांतिकारक ओवी युनियन जिल्हाध्यक्ष सुवर्णाताई जगधने यांनी गायली, सावित्रीबाई यांच्या प्रतिमेस उपस्थित असंघटित घरकामगार सर्व महिला यांनी पुष्पहार घालून व पुष्प अर्पण करुन क्रांतीज्योती यांच्या घोषणा देऊन जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. यावेळी सुगी फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप कोकाटे यांनी पहिल्या स्त्री शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी शैक्षणिक क्षेत्रात क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांच्यासोबत कुटुंब चालवत मूलभूत गरजा आणि प्रतिगामी विचारसरणी असलेल्या पुरुषसत्ताक संस्कृतीच्या विरोधात संघर्ष करत आशिया खंडातील व भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू करून स्त्रियांनी फक्त चूल आणि मूल काम न करता स्त्रियादेखील पुरुषांसोबत खांद्याला खांदा देऊन शिक्षण घेण्याचा मूलभूत हक्क आहे हे कृतीतून सिद्ध केले.
जगातील परिवर्तनासाठी काम करण्याचा अधिकार स्त्रियांना आहे, आणि पुरुषसत्ताक प्रधान संस्कृतीला लढा देण्याचा स्त्रियांना मार्ग शिक्षणातून दाखवला. याचा ऐतिहासिक संदर्भ देत व आज २०२२ या काळात जगात व देशात स्त्रियांची स्थिती जातीव्यवस्था, भांडवलदार, कष्टकरी स्त्री, मध्यमवर्गीय स्त्री, यांच्यातील भेद व सध्या स्त्रियांवर होत असलेला अन्याय अत्याचार याला तोंड देण्यासाठी क्रांतिकारक महामानवांनी काम केलेल्या संघर्षात्मक विचार सरणीची आज आपल्याला अत्यंत गरज आहे. यासाठी सावित्रीबाई फुले, जिजामाता, राणी झलकारी यांच्यासारखे काम करत राहावा लागणार आहे आणि आपण सर्व काम करत राहूयात.
आजही शिक्षणाची अत्यंत गरज आहे तरच कुटुंब परिवर्तन करु शकते. आपल्याला आपल्यातूनच क्रांतिकारक लढणाऱ्या महिला कृतीतून निर्माण कराव्या लागतील, ही आपल्यापुढे जागतिक खाजगी करणांमध्ये खूप मोठे आव्हान आहे. आणि ते आव्हान आपण स्वीकारलेले आहे हे संदर्भासहित उदाहरण देत मार्गदर्शन केले. यावेळी घरकामगार युनियनच्या सचिव वर्षाताई बाचकर यांनीही क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बाबत आपले मनोगत व्यक्त केले. बेबीताई शिंदे, अंजुम शेख आदी घरकामगार महिला उपस्थित होत्या.
0 टिप्पण्या