आ. डॉ. सुधीर तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त विध्यार्थ्यांना वह्या वाटप

राहुरी / बाळकृष्ण भोसले - नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार मा.डॉ. सुधीरजी तांबे यांच्या वाढदिवसा निमित्त कोल्हार खुर्द जिल्हा परिषद मराठी शाळा येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या.

प्रसंगी राहुरी तालुका काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसले म्हणाले आ.डॉ. सुधीरजी तांबे यांच्या विचारां नुसार गरीबातील गरीब मुलांना शिक्षण मिळाले पाहिजे.व शिक्षण घेवून मोठे ज्ञान प्राप्त केले पाहिजे. त्यासाठी काँग्रेस कार्यकत्यानी आपापल्या परीने सर्व सामान्यांना वेळोवेळी मदत केली पाहिजे. या विचारानुसार आम्ही काँग्रेसच्या वतीने डॉ. तांबे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वह्या वाटप करत आहोत.

यावेळी कोल्हार खुर्द जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्री.बी.एन नाईकवाडे सर यांच्या अध्यक्षतेखाली व कोल्हार खुर्द काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश पाटील शिरसाठ, तालुका सरचिटणीस संजय भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसचे ओ. बी. सी. विभागाचे अध्यक्ष दिग्विजय शिरसाठ, सामाजिक कार्यकर्ते संतिष शिरसाठ, दत्तात्रेय शिरसाठ, आल्फोन्स भोसले, रामाजी क्षिरसागर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या