राहुरी - ब्राह्मणी गावचे सुपुत्र, माजी सैनिक बाळासाहेब बापू वने यांचे बुधवार, २९ डिसेंबर २०२१ रोजी दुःखद निधन झाले.
सैन्य दलातील सेवानिवृत्तीनंतर शेतीशी मैत्री केलेल्या मेजर वने यांना आजार पणाला सामोरे जावे लागले. अनेक दिवस आजारपणाशी दोन हात करत जीवन जगताना वडील भाऊसाहेब वने, पत्नी कविता, मुलगी रक्षा व मुलगा विशाल, भाऊ देविदास, रोहिदास, बाबासाहेब, शिवाजी यांनी मोलाची साथ दिली. म्हणतात ना नियती पुढे कोणाचे काही चालत नाही. अन् नियतीने त्यांच्या वर घाला घातला. त्यांनी आज सर्वांचा निरोप घेतला.
त्यांच्या पश्चात वडील, भाऊ, पत्नी, मुलगी, मुलगा, बहीण असा परिवार आहे. उद्या शुक्रवार, दि. ७ जानेवारी २०२२ रोजी त्यांचा दशक्रिया विधी आहे.
0 टिप्पण्या