कटारे यांचा आदर्श बी एल ओ पुरस्काराने सन्मान

श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : खा.गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, निमगांवखैरी या विद्यालयातील उपक्रमशील आदर्श शिक्षक व पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन अशोक कटारे यांना यावर्षीचा आदर्श बी एल ओ पुरस्कार श्रीरामपूर विभागाचे प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, प्राचार्य डॉ. सुहास निंबाळकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

२५ जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त सी. डी. जैन काँलेज श्रीरामपूरच्या हाँलमध्ये ह्या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. नवीन मतदार नोंदणी, मतदार जागृती, मतदार यादीतून नाव वगळणे, समाविष्ट करणे, स्थलांतरित मतदार, मयत मतदार, नावातील, राहण्याच्या ठिकाणातील दुरूस्ती इ.बाबींची काळजीपूर्वक माहिती घेऊन बी एल ओ यांनी आपापल्या प्रभागात काम करायचे असते. श्री.कटारे यांनी नवमतदार तसेच वृद्ध मतदार यांची घरोघर जाऊन माहीती घेऊन आपली मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम केल्याबद्दल हा सन्मान करण्यात आला. अनेक सामाजिक, शैक्षणिक कामाची आवड असल्याने या आधीही श्री कटारे यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.

या पुरस्काराबद्दल नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ. बबनराव आदिक, सचिव अविनाश आदिक, सहसचिव अँड.जयंत चौधरी, सर्व गव्हनिँंग कौ.सदस्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर वृंद आदिंनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या