राहुरी : भारतीय सीमा सुरक्षा दल यामध्ये 21 वर्षे सेवा देऊन निवृत्त होऊन वांबोरी येथे आपल्या घरी परतल्यानंतर ईश्वर आरोटे यांचा श्री संत सावतामाळी संघातर्फे सन्मान करण्यात आला.
यावेळी संत सावता माळी युवक संघाचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष अशोकराव तुपे, महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया प्रमुख दिपकराव साखरे, वांबोरी शहराध्यक्ष सुनील शिंदे, निलेश येलजाळे, कमलेश सत्रे, सोमनाथ कुऱ्हे, मनोज देशमाने, राजेंद्र आरोटे, संदीप व्यवहारे, जावेद शेख, बाप्पू दुधाडे, दीपक पुंड, संतोष विधाटे, भैय्या पुंड आदींनी शुभेच्छा दिल्या.
आज भारत मातेच्या सेवेसाठी सैनिक अहोरात्र आपले घर प्रपंच सोडून देशाच्या सेवेसाठी आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या सेवेमुळे आपण सुखात आपल्या कुटुंबसह आनंदात राहत आहोत.
त्यामुळे सेवानिवृत्त जवानांचा सन्मान झालाच पाहिजे या हेतूने संघटनेच्या वतीने ईश्वर आरोटे या सेवानिवृत्त जवानाचा सन्मान करण्यात आला. यापुढेही त्यांच्या हातून समाजाची व आपल्या गावाची सेवा घडो अशा शुभेच्छा श्री संत सावता माळी युवक संघटना व माळीगल्ली मित्र परिवार तर्फे देण्यात आल्या.
0 टिप्पण्या