अहमदनगर/ जावेद शेख : सावित्रीबाई फुले यांच्या 191 व्या जयंतीनिमित्त आयोजित गोरे डेंटल हॉस्पिटल माळीवाडा व श्री संत सावता माळी युवा संघ अहमदनगर यांच्या वतीने राबवण्यात आलेला चित्रकला व निबंध स्पर्धेमुळे तरुण पिढीला निश्चितच प्रेरणा भेटेल व सावित्रीबाईंचे कार्य हे समाजामध्ये रुजण्यास मदत होईल असे प्रतिपादन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक हरीश खेडकर यांनी केले.

निबंध व चित्रकला स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी खेडकर, महापौर सौ. रोहिणीताई शेंडगे, कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे, प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, नगरसेविका सुवर्णाताई जाधव, महात्मा फुले समता परिषद महानगराध्यक्ष दत्ता जाधव, श्री संत सावता माळी युवक संघाचे महाराष्ट्र अध्यक्ष सचिन गुलदगड, जिल्हाध्यक्ष अशोकराव तुपे, गोरे डेंटल हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुदर्शन गोरे, दिपक साखरे, अनिल ईवळे आदी उपस्थित होते. 

या प्रसंगी पोलीस निरीक्षक संपत शिंदे साहेब म्हणाले की सावित्रीबाई फुले यांचे कार्य दोनशे वर्षांनंतर देखील महिलांसाठी प्रेरणादायी आहे. महापौर रोहिणीताई शेंडगे म्हणाले की अशा प्रकारे नगरकरां करता निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त करणे हे निश्चितच अभिनव उपक्रम आहे. प्रथम महापौर भगवान फुलसौंदर म्हणाले की, अशा प्रकारच्या उपक्रमामुळे समाजामध्ये जनजागृती होऊन महापुरुषांच्या प्रति आदर निर्माण होतो.

आयोजक व डॉ. गोरे डेंटल हॉस्पिटल चे संचालक डॉ. सुदर्शन गोरे म्हणाले की सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शैक्षणिक उपक्रम राबवून ही जयंती साजरी करणे हा यामागील उद्देश होता. सचिन गुलदगड यांनी सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य हे संघर्षमय व प्रेरणादायी होते प्रतिपादन केले. सौ. स्वाती सुडके यांनी सुत्रसंचलन केले. तसेच जिल्हाध्यक्ष अशोकराव तुपे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले. याप्रसंगी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित चित्रकला व निबंध स्पर्धेचे निकाल खालील प्रमाणे...

चित्रकला स्पर्धा
माध्यमिक गट
प्रथम क्रमांक 6 वी अ आरुष विटणकर द आयकॉन पब्लिक स्कूल, द्वितीय क्रमांक सहावी अ कुमारी शताक्षी नंदू लोणकर अशोक भाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल, तृतीय क्रमांक सातवी अ कुमारी दिया संतोष कुमार कोल्हे नवीन मराठी शाळा विश्रामबाग.

उच्च माध्यमिक गट
प्रथम क्रमांक कुमारी भाग्यश्री यशवंत थोरात नववी दामोदर विधाते मास्तर माध्यमिक विद्यालय, द्वितीय क्रमांक कुमारी सृष्टी प्रवीण हिकरे आठवी भिंगार हायस्कूल भिंगार, तृतिय क्रमांक कुमारी निशा संतोष गाडेकर नववी दामोदर विधाते मास्तर माध्यमिक विद्यालय

खुला गट
प्रथम क्रमांक उन्नती नितीनकुमार शेटीया अरिहंत कॉलेज ऑफ फार्मस, द्वितीय क्रमांक कुमारी वैष्णवी ज्ञानेश कोटा, तृतीय क्रमांक श्री प्रवीण सोपान साळुंके, चौथा क्रमांक कुमारी श्रद्धा दीपक कानोरे, पाचवा क्रमांक कुमारी पूजा सुनील सकट

निबंध स्पर्धा
उच्च माध्यमिक गट
प्रथम क्रमांक इयत्ता नववी कुमारी पूजा पोपट चौधरी श्रीकांत प्रेमराज गुगळे हायस्कूल माळीवाडा, द्वितीय क्रमांक इयत्ता दहावी कुमारी मृणाली शंकर जगताप श्रीकांत प्रेमराज गुगळे हायस्कूल माळीवाडा, तृतीय क्रमांक नववी कुमारी भाग्यश्री लक्ष्मण वायभासे काही दामोदर विधाते मास्तर विद्यालय, चौथा क्रमांक दहावी चिरंजीव रोहित संजय कांबळे श्रीकांत प्रेमराज गुगळे हायस्कूल माळीवाडा, पाचवा क्रमांक नववी चिरंजीव ओमकार भाऊसाहेब पालवे श्री समर्थ विद्या मंदिर सावेडी.

खुला गट
प्रथम क्रमांक व सौ गीतांजली महेश जाधव, व्दितीय क्रमांक श्रीमती स्नेहल संजय छाजडे, तृतीय क्रमांक श्रीमती शशिकला बागडे, चतुर्थ क्रमांक संगीतांजली भाऊसाहेब गरजे, पाचवा क्रमांक सौ सुषमा सुनील वैद्य, विशेष प्राविण्य सौ स्वाती राहुल सुडके.

माध्यमिक गट
प्रथम क्रमांक कुमारी श्रद्धा विजय बर्वे सहावी अ रेसिडेन्शिअल हायस्कूल, द्वितीय क्रमांक कुमारी वेदिका विजय शिंदे सहावी अ.