पैठण तालुक्यातील बिडकीन येथील सरस्वती भुवन प्रशालेत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शालेय समितीचे अध्यक्ष नंदकुमार वैद्य, उपमुख्याध्यापक राजेंद्र कोठावदे, डॉ.खंदारे, डॉ.संजय गोरे, बाबासाहेब सोकटकर, ज्ञानेश्वर चाटुपळे, राजश्री देशपांडे, संतोष शिंदे, अनिल साबळे उपस्थित होते. दरम्यान प्रमुख अतिथी यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
३ जानेवारी ते १० जानेवारी या कालावधीत जिजाऊ ते सावित्री सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा या उपक्रमांतर्गत प्रशालेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी जेष्ठशिक्षक ज्ञानेश्वर चाटुपळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महेर पठाण, विद्या चव्हाण, श्रुती जाधव, दिशा श्रीवास्तव, दिक्षा कासोटे, ऋतुजा गिरी, किरण कोथिंबीरे, प्रिती जाधव, मनप्रित राठोड, मेहक शेख या विद्यार्थ्यांनी थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित भाषणे केली. मुख्याध्यापक मधुकर बिरहारे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर चौफेर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावणी काळे तर आभार ऋतुजा गिरी हिने मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी प्ररीश्रम घेतले.
0 टिप्पण्या