राहुरी : राज्य सरकारच्या आदेशानुसार १ फेब्रुवारी पर्यंत देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीतील दुकान, हॉटेल, शाळा व हॉस्पिटल वरील पाट्या मराठीत कराव्यात, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात असे म्हंटले आहे की, पालिकेने पत्रक काढून सर्व आस्थापनांना मराठीत पाट्या अनिवार्य कराव्यात, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुख्याधिकारी निकत यांच्या कडे करण्यात आली आहे.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष संदेश पाटोळे, साहिल पठाण, अनिल गीते, सौरभ निकम, शुभम गीते, सचिन सोनवणे, यश सरोदे, नरेश गोरे आदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या