श्रीगोंदा/ सुभाष दरेकर : तालुक्यातील हिरडगाव येथे महावितरणचा गलथान कारभार पाहण्यास मिळत आहे. गेल्या वर्षभरापासून शेतकर्यांना विजेच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. आठवड्यातून दोन दोन दिवस दहा ते बारा विद्युत रोहीत्र बंद ठेवले जात आहे.
सुभाष दरेकर यांनी महावितरण कंपनीचे अधिकारी चौगुले यांना फोन करून या कर्मचार्याच्या कारनाम्या विषय माहीती सांगितली व प्रतिक्रिया विचारली असता उडवाउडवीची उत्तरे देऊन वडते यांना फोन करण्यास सांगितले. वडते यांना फोन केला असता विचारून फोन करतो म्हणतात, असे उडवाउडवीची उत्तरे महावितरण कडुन मिळाली आहे.
या वीज प्रश्नाला शेतकरी तोंड देत आहे व विद्युत रोहीत्र बंद करून इतर विद्युत रोहित्रावरील शेतकऱ्यांना पिकांना पाणी द्यावे लागते. पण महावितरणमध्ये कार्यरत असणारा कर्मचाऱ्यांच्या क्षेत्रालगत असणारे विद्युत रोहित्र मात्र कधीच बंद नसते. त्यांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळतात. हा कर्मचारी हिरडगाव ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच यांचा पती आहे. मग गावातील सर्व सामान्य शेतकऱ्यांना एक नियम व सरपंचाला वेगळा असे का ?
महावितरण आपल्या कर्मचार्याची बाजु धरून सर्व सामान्य शेतकऱ्यांवर अन्याय करते का ? असा प्रश्न सर्व सामान्य जनतेच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. या विषयी महावितरण कंपनीने योग्य ती कारवाई करुन विजेची समस्या सोडविण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
आपले गाव विजेच्या समस्येला वर्षभर तोंड देत आहे. ट्रान्सफार्मर बंद करण्यासाठी कामगारांना कष्ट घ्यावे लागते. पण सर्व सामान्य शेतकऱ्यांना फसवून आपला ट्रान्सफार्मर कायम चालू ठेऊन स्वतः च्या पिकांचे नुकसान टाळून दुसर्याच्या पिकांचे नुकसान करणं हे कर्मचार्याचे कर्तव्य नाही._ मनिषा शिंदे; माजी सरपंच हिरडगाव
" जो तळ राखतो तो पाणी चाखतो " या म्हणी प्रमाणे कर्मचारी वागत असेल तर त्याला वरिष्ठांनी जाब विचारला पाहिजे व शेतकर्यांवर अन्याय करू नये._ राजेंद्र ठकाजी दरेकर; युवा नेते हिरडगाव
कर्मचारी स्वतः चा ट्रान्सफार्मर कायमचा चालू ठेऊन गावाच्या डोळ्यात धुळ फेकत असेल तर त्याला कामावर राहण्याचा काहीच अधिकार नाही. महावितरण कंपनीने कारवाई करावी._ सारीका राजेंद्र दरेकर; नवनिर्वाचित सदस्या ग्रामपंचायत हिरडगाव
0 टिप्पण्या