राहुरी शहर/अशोक मंडलिक : क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या १९१ व्या जयंतीनिमित्त वांबोरी मध्ये श्री संत सावता माळी युवक संघातर्फे वांबोरी ग्रामपंचायत, डोंबार वस्ती अंगणवाडी शाळा अशा ठिक ठिकाणी विनम्र अभिवादन करण्यात आले.
माळीगल्ली येथील सावता मंदिरात जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समितिचे माजी सभापती सुभाष पाटील यांच्या हस्ते सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना सुभाष पाटील म्हणाले की आज समाजामध्ये विविध क्षेत्रा मध्ये महिलांना सन्मान मिळत आहे केवळ क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीमाई फुले यांच्या मुळेच मिळत आहे. यांचे कार्य अविस्मरणीय आहे अशा शब्दा मध्ये सावित्रीमाई फुले यांच्या कार्याचा गौरव करून अभिवादन केले.
यावेळी संत सावता माळी युवक संघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष अशोकराव तुपे, महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया प्रमुख दीपक साखरे, वांबोरी शहराध्यक्ष सुनील शिंदे, बाबासाहेब गाढे, योगेश राऊत, गोरक्षनाथ सत्रे, प्रमोद गांधले, दिपक पुंड, शिवाजी पुंड, संदीप कुऱ्हे, रवी सत्रे, यश साखरे, लाला वाघ, संजय वांढेकर, कैलास ताकटे, युसूफ भाई शेख, जयश्री शेटे, इंद्रायणी सत्रे आदी फुले प्रेमी उपस्थित होते.
0 टिप्पण्या