इपीएस पेन्शनधारकांचे खा. लोखंडे यांना निवेदन

श्रीरामपूर [ बाबासाहेब चेडे ] : देशातील ६७ लाख पेन्शन धारकांचा पेन्शनवाढीचा प्रश्न प्रलंबित असून सध्या देशभर पेन्शनर बचाव आंदोलन चालू असून पेन्शनधारक वैयक्तिक पोस्टकार्डवर आपल्या मागण्या थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवीत आहेत. तसेच सर्व खासदार यांना निवेदन देण्याचे आयोजन असल्याने श्रीरामपूर तालुक्यातील पेन्शनधारकांच्या शिष्टमंडळाने आपल्या संघातील खा.सदाशिव लोखंडे यांना निवेदन दिले व सविस्तर चर्चा केली.

शिष्टमंडळात राष्ट्रीय संघर्ष समिती तालुकाध्यक्ष राधाकृष्ण धुमाळ, संपतराव मुठे, भारत छल्लारे, डी एस पटारे, दिलावरभाई, नवाज शेख आदी होते. लोकसभेत हा प्रश्न लवकर उपस्थित करण्याचे आश्वासन खा.लोखंडे यांनी दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या