आरडगांव/ राजेंद्र आढाव : गुरुदेव दत्त विविध कार्यकारी सेवा सोसायटी केंदळ खूर्दच्या अध्यक्षपदी अनिल अंबादास आढाव तर उपाध्यक्षपदी संजय अण्णासाहेब गुंजाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
राहुरी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या गुरुदेव दत्त विविध कार्यकारी सेवा सोसायटी केंदळ खूर्द या संस्थेची निवड प्रक्रिया सोसायटीच्या सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष जालिंदर आढाव हे होते. अनिल आढाव यांच्या अध्यक्ष पदाची सूचना जालिंदर भिकाजी आढाव यांनी मांडली तर अनुमोदन राजेंद्र मुरलीधर आढाव यांनी दिले.
उपाध्यक्ष पदासाठी संजय गुंजाळ यांच्या नावाची सूचना रमेश गेणू राऊत यांनी मांडली तर अनुमोदन गोरक्षनाथ गुंजाळ यांनी दिले. हि निवड बिनविरोध करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक राहुरी एन. डी. खडेराय, सुभाष सांगळे, सचिव विनायक सावंत यांनी काम पाहिले आहे.
या प्रसंगी जालिंदर आढाव, शिवाजी आढाव, गोरक्षनाथ गुंजाळ, प्रकाश आढाव, चंद्रकांत आढाव, मुक्ताबाई आढाव, शोभाताई आढाव, रमेश राऊत, आसाराम कांबळे, राजेंद्र आढाव, डॉ प्रकाश आढाव, राजेंद्र गुंजाळ, विजय मगर, विकास मगर, सोपान आढाव, अदिनाथ झिने आदी संचालक सभासदासह ग्रामस्थ उपस्थित होते.
0 टिप्पण्या