संगमनेर शहर : संगमनेर तालुक्यातील निमगाव बु येथील जिल्हा मजुर फेडरेशन अ.नगर संचालक नानासाहेब कानवडे यांची नात रिया भागवत कानवडे हिचा २२ जुन २०२१ रोजी महाराष्ट्रातील प्रसिद्ध झालेल्या पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे लोकनेते आमदार निलेश लंके साहेब यांच्या कोव्हिडं सेंटर मध्ये रिया हिचा जादूचा कार्यक्रम घेण्यात आला होता.
त्यावेळी आमदार निलेश लंके साहेब यांना रिया च्या जादूगार शो ने प्रभावीत केले. कमी वयात तीने हालकीच्या परीस्थितीत जादू ची कला आपल्या वडिलांकडून अवगत केली. कोरोना महामारीच्या काळात ऑन लाईन पद्धतीने ११ देशाच्या स्पर्धकांमध्ये भाग घेऊन रिया ने प्रथम क्रमांक पटकवला. तिची फेब्रुवारी २०२२ मध्ये श्रीलंका मध्ये स्पर्धेसाठी निवड झाल्याचे समजताच आमदार निलेश लंके यांनी रिया हिचा पासपोर्ट व इंनव्हीटेशन लेटर घेऊन या मी ५१,००० रुपये मदत निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने देतो, असा शब्द दिला होता.
आज दि. ३ जानेवारी २०२२ रोजी रिया व तिच्या वडिलांनी आमदार निलेश लंके यांची भेट घेऊन सर्व कागदपत्रे बघताच आमदार निलेश लंके यांनी दिलेला शब्द पाळत प्रतिष्ठान च्या वतीने ५१,००० रुपये मदत सुपूर्त केली. रियाच्या या मदतीसाठी इंजि. धनंजय गुळवे तसेच छावा क्रांतिवीर सेनेचे जिल्हाध्यक्ष इंजि आशिष कानवडे यांनी विशेष प्रयत्न केले.
यावेळी मदत स्वीकारताना कृष्णा दुध उत्पादक संस्थेचे चेअरमन रामनाथ कानवडे, जादूगार के भागवत, बाबाजी कानवडे, अल्पसंख्याक युवक काँग्रेस सरचिटणीस अमीन शेख, जि.प.शाळा निमगाव बु व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष सचिन कानवडे, नितीन कानवडे व स्वतः जादूगार रिया कानवडे व आदी मान्यवर उपस्थित होते.
0 टिप्पण्या