अहमदनगर/ जावेद शेख : दि. २४ जानेवारी २०२२ रोजी भूमीअभिलेख कार्यालय, राहुरीचे थोरात यांना नवीन महसूल गाव बुळे पठारचा नवीन महसुली गावचा हद्द नकाशा तात्काळ मिळावा, याबाबत दिनांक २६ जानेवारी २०२२ रोजी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भुमिअभिलेख कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल, याबाबतचे लेखी निवेदन देण्यात आले होते, तात्काळ आजच्या आजच भूमी अभिलेख कार्यालयाने बोंबाबोंब आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ दिनांक २४ जानेवारी २०२२ रोजी सायं. ५.३० वा. दरम्यान स्वतंत्र बुळे पठार महसूल गावचा नवीन हद्द नकाशा कार्यकर्त्यांना स्वतः भूमी अभिलेख अधिकारी यांनी बोलावून समक्ष बुळे पठारच्या कार्यकर्त्यांच्यां हातात दिला. म्हणून २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी घोषित केलेले बोंबाबोंब आंदोलन स्थगित करण्यात येत आहे असे श्रमिकने घोषित केले आहे.
यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे संदिप कोकाटे, मच्छिंद्र दुधवडे, भाऊसाहेब बुळे, डॉ.जालिदंर घिगे (कोळेवाडी सरपंच) व वंचित बहुजन आघाडीचे वर्षाताई बाचकर, गणेश पवार, निलेश जगधने, नाना साळवे, प्रहारचे सुरेश लाबें आदी सक्रिय कार्यकर्ते यांनी आपल्या आंदोलनास पाठिंबा दर्शवला होता. समक्ष नकाशा घेतेवेळी श्रमिक मुक्ती दलाचे कार्यकर्ते व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सक्रीय रित्या सहभागी होऊन भूमिअभिलेख यांच्या सोबत सकारात्मक चर्चा केली. आंदोलनाला यश आल्याने २६ जानेवारी २०२२ रोजी चे बोंबाबोंब आंदोलन स्थगित करत आहोत.
0 टिप्पण्या