'साई प्रवरा'ने शेतकरी ते ग्राहक यांमधील दुवा बनावे - आ. लहू कानडे

अहमदनगर/ जावेद शेख : शेतकरी उत्पादक कंपनी सहकाराला मिळती जुळती पण राजकारण विरहीत शासनाची एक चांगली संकल्पना असून त्यामाध्यमातून शेतकरी हिताचा विचार करून शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल 'शेतकरी ते ग्राहक' यांमधील दुवा म्हणून काम करावे असे मत श्रीरामपूरचे लोकप्रिय आमदार लहू कानडे यांनी केसापूर ता. राहुरी येथील साई प्रवरा शेतकरी प्रोड्युसर कंपनीच्या कांदा चाळ प्रकल्पाच्या भेटी प्रसंगी व्यक्त केले.

आ. कानडे यांनी दहा गावांतील एक हजार सभासद असलेल्या कंपनीच्या नाफेड, महाएफपीसी व साई प्रवरा शेतकरी प्रोड्युसर कंपनी संचालित पीपीपीआयएडी एक हजार टन क्षमतेच्या कांदा चाळ प्रकल्प व कांदा साठवणुक, कापूस, सोयाबीन, मका यांची प्रतवारी, चिंचोली येथील कडधान्य प्रकल्प, तांभेरे येथील शेतकरी सुविधा केंद्र, पन्नास टनी काटा आदी उपक्रमांची माहिती घेतली.

यावेळी कंपनीने नवनियुक्त अध्यक्ष संभाजी नांनोर तसेच केसापूर ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच बाबासाहेब पवार, उपसरपंच अनिल भगत, तंटामुक्तीच्या वतीने अध्यक्ष जगन्नाथ हिंगे, उपाध्यक्ष विलास टाकसाळ, अंमळनेरचे माजी सरपंच सतिश जाधव यांनी आ. लहू कानडे यांचा सत्कार केला. अधिक मार्गदर्शन करताना आ. कानडे म्हणाले की, कंपनीने एव्हड्यावरच न थांबता शेती उत्पादक मालाची प्रक्रिया करून बायप्रोडक्त तयार करणे, सेंद्रिय अन्नधान्य व भाजीपाला यावर भर देणे, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगवर भर देणे, विकेल ते पिकेल, हायटेक व्हर्टिकल शेती काळाची गरज ओळखून तंत्रज्ञान अवगत करून शेतकऱ्यांपर्यंत कंपनीने पोहोचविण्याचे काम करावे. निर्यातक्षम माल निर्मितीवर कंपनीने भर द्यावा. याकामी परिसरातील कंपन्यांची संयुक्त बैठक आयोजित करून त्यासाठी कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र विभागातील तज्ञांचा परिसंवास घडवून आणू. शेती व्यवसायाविषयी शासनाच्या माध्यमातून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे मत आपल्या मार्गदर्शन प्रसंगी व्यक्त केले.

यावेळी कंपनीचे उपाध्यक्ष नंदकिशोर मुसमाडे, सचिव दादासाहेब मेहेत्रे, कार्यकारी संचालक सुनिल साबळे, संचालक रायभान जाधव, कुंडलिक खपके, राजेंद्र वडीतके, व्यवस्थापकीय संचालक संतोष मेहेत्रे, सचिन टाकसाळ, साहेबराव हिंगे, नामदेव मेहेत्रे, पोपट मेहेत्रे, अनिल मेहेत्रे, अशोक किसन टाकसाळ, नरेंद्र मेहेत्रे, अभिषेक मेहेत्रे, अमृत शिरसाठ आदी सभासद व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या