बाळासाहेब भोर /संगमनेर : तालुक्यातील कोल्हेवाडी गावचे युवा उद्योजक दिव्यधारा ग्लोबल मार्केटिंग प्रा.लि.चे सी एम डी अमित कोल्हे यांचा नुकताच कृषी उद्योजक पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.
स्व.देवराम कारभारी शिंदे फाउंडेशन संचलित नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. दिव्यधारा ग्लोबल मार्केटिंग प्रा.लि.च्या माध्यमातुन श्री कोल्हे यांनी शेतातील पिकांसाठी जैविक औषधांवर भर दिला असून रासायनिक पेक्षा जैविक औषधं भविष्यातील शेतीसाठी कशी किफायती आहेत यासाठी शेतकऱ्यांमध्ये त्यांनी जनजागृती निर्माण केली आहे.
त्या दृष्टीकोनातून दिव्यधारा कंपनीने शेतीसाठी लागणारी विविध जैविक उत्पादने तयार केलेली आहेत. श्री कोल्हे हे तसे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असल्याने त्यांना शेतकऱ्यांच्या समस्या व संघर्ष नक्कीच माहिती आहे. तसेच कोरोनासारख्या महामारीत मोठमोठे उद्योग डबघाईला आले असताना अमित कोल्हे यांनी दिव्य धारा कंपनी यशाच्या शिखरावर पोहोचविण्यासाठी जिद्द, चिकाटी व संघर्षातून आपलं अस्तित्व निर्माण केलं आहे.
कोरोनाच्या संकटात आपल्या कुटुंबातील एका सदस्याला गमावून देखील त्यांनी नशिबापुढे कधीच हार मानली नाही व तेवढ्यात ताकतीने ते पुन्हा मैदानात उतरले. दिव्य धारा कंपनीच्या माध्यमातून अनेक युवा होतकरूंना रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम त्यांनी केलं. उद्योग क्षेत्रात काम करत असताना त्यांनी सामाजिक कार्यालाही तेवढेच महत्व दिलं आहे. तसेच संपूर्ण संगमनेर तालुक्यात खुप मोठा जनसंपर्क असल्यामुळे उद्योग क्षेत्रातील एक प्रेरणादायी नाव म्हणून आज लोक त्यांच्याकडे बघतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना कृषी उद्योजकता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
याप्रसंगी प्रांताधिकारी पूजा गायकवाड, सेंद्रिय शेती सल्लागार नाईकवाडी साहेब, सीमाताई कोकाटे इतर प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला.
0 टिप्पण्या