सत्याची कास धरून जीवनाचे सोने करण्याची आदर्श शिकवण कॉ.पी. बी. कडू पाटील यांनी दिली - आ. लहू कानडे

अहमदनगर/ जावेद शेख : सत्याची कास धरून जीवनाचे सोने करण्याचा आदर्श थोर स्वातंत्र्य सेनानी, रयत शिक्षण संस्थेचे माजी उपाध्यक्ष कॉ. पी. बी. कडू पाटील यांनी समाजापुढे ठेवला आहे. आजच्या तरुण पिढीपर्यंत आप्पांचे हे प्रेरणादायी विचार जाणे गरजेचे असल्याचे मत आ. लहूजी कानडे यांनी मांडले आहे.

सात्रळ ता. राहुरी येथील रयत शैक्षणिक संकुलात थोर स्वातंत्र्य सेनानी व माजी आमदार कॉ.पी.बी कडू पाटील यांचा पाचवा स्मृतिदिन सोहळा व समाजसेवा दिन संपन्न झाला, यावेळी प्रमुख भाषणात ते बोलत होते. सोहळ्याच्या प्रारंभी मान्यवरांनी आप्पांच्या व मातोश्री शांताबाई कडू पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संभाजीराव चोरमुंगे हे होते. आपल्या प्रास्ताविक भाषणात रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील यांनी रयतचे माजी चेअरमन स्व.प्रा. एन. डी. पाटील व स्व.सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून त्यांच्या समाज कार्याचा गौरव केला. स्व. प्रा.एन. डी. पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेसाठी दिलेले योगदान, कार्य संस्थेसाठी घेतलेले फायदेशीर निर्णय, सामाजिक कार्य या बाबी अविस्मरणीय अशा आहेत. तसेच स्व. सिंधुताई सपकाळ यांनी यांचे सामाजिक कार्य, त्यांच्याशी असलेले कौटुंबिक संबंध याचा विस्तृत उल्लेख आपल्या प्रास्ताविकात केला.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आ.लहू कानडे यांनी आपले विचार मांडताना सांगितले की थोर स्वातंत्र्य सेनानी कॉ. पी.बी.कडू पाटलांचे विचार, साम्यवादासाठी त्यांनी केलेला संघर्ष, विचारांना तिलांजली न देता आपल्या तत्वासाठी केलेली लढाई, शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब यांच्या मुलांच्या शिक्षणासाठीची तळमळ, त्यातील कार्य, स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचे योगदान व सहभाग, तसेच त्यांच्या बरोबर काम करताना आलेले अनुभव अश्या विविध पैलूंचा आढावा घेत त्यांच्या विचारांचा आदर्श तरुणांपर्यंत पोहचविणाचे आवाहन त्यांनी सर्व उपस्थितांना केले. या कार्यक्रमाप्रसंगी युवानेते पंकज अरुण कडू पाटील मित्र मंडळ यांच्या वतीने गरजू रुग्णांना विनामूल्य हॉस्पिटल बेड, व्हील चेअर, कमोड चेअर, वाॅकर, एअर बेड साहित्याचे लोकार्पण करण्यात आले.

या प्रसंगी प्रगती पतसंस्थेचे चेअरमन विजयराव कडू पा, प्राचार्य गहिनाथ विखे, बाळासाहेब केरुनाथ विखे पा., डॉ. के. के. बोरा, ॲड. बाळकृष्ण चोरमुंगे, बबनराव कडू, शांतीलाल भाऊ गांधी, दिलीपराव डुक्रे, भास्करराव फणसे, वसंतराव ब्राह्मणे, अनिलशेट लोढा, विलास मुंदडा, किशोरशेठ भांड, किरण पा.कडू, पंकज पा.कडू, विक्रांत पा.कडू, गणेश पा.कडू, नंदूभाऊ कडू, सागर डुक्रे, प्राचार्य अशोकराव वानखेडे, मुख्याध्यापिका सौ. अनिता निबे मॅडम, अश्वी रयत संकुलचे मुख्याध्यापक सी. एन. गोर्डे, लोणी रयत संकुलाचे प्राचार्य. जी. टी. गमे, रयतसेवक वर्ग तसेच ग्रामस्थ व महिला मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश कडलग व सिराज मन्सुरी यांनी केले. तर युवानेते पंकज कडू पाटील यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या