श्रीरामपूर बाबासाहेब चेडे : भागवत प्रतिष्ठान व स्वस्तिक ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच के.के.आय (बुधरानी) हाॅस्पिटल, पुणे यांच्या सहकार्याने काळे हाॅस्पिटल, गणपती गल्ली, बेलापुर बु. या ठिकाणी उद्या बुधवार दि. १९ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत ५८ वे मोफत मोतीबिंदु निदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन भागवत प्रतिष्ठान, बेलापूर बु।। चे अध्यक्ष अभिषेक खंडागळे यांनी केले आहे. या शिबिराची माहिती आपल्या गावात व परिसरात जास्तीत जास्त नागरिकांना होईल व जास्तीत जास्त नागरिक शिबिरात सहभागी होतील यासाठी सहकार्य करावे. त्याचबरोबर पेशंटने येताना आधार कार्ड झेरॉक्स, रेशनकार्ड झेरॉक्स, कोरोना चाचणी (RTPCR) रिपोर्ट सोबत आणावे.
0 टिप्पण्या