राहुरी / बाळकृष्ण भोसले - येथील लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधिने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील प्रा.शिंदे विजयकुमार गुलाबराव यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्राप्त झाली आहे. "कृषि मालाच्या किमान आधारभूत किंमती व उत्पादन खर्चाच्या सहसंबंधाचा चिकित्सक अभ्यास" या विषयाचा शोधप्रबंध प्रा.शिंदे यांनी पुणे विद्यापीठास सादर केला होता. सदर संशोधन शेतकरी वर्गाला निश्चितच लाभदायक ठरेल माहिती प्रा. शिंदे यांनी दिली.
प्रा.शिंदे यांनी विद्यावाचस्पती (पीएच.डी) पदवी विपणन विषयातील वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतर्गत प्राप्त केलेली आहे. त्यांना कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, राहाता येथील (डॉ.) सौ. माधवी पाटगावकर, प्रो.(डॉ.) भोर जे.आर, प्रो. (डॉ.) बारहाते जी. एच. यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. शिंदे विजयकुमार यांचे बत्तीस संशोधनपर लेख विविध राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावरील नियतकालिकातून प्रसिद्ध झालेले आहेत. पुणे विद्यापीठांमधील वाणिज्य विभागाने आयोजित केलेल्या राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये उत्कृष्ट शोधनिबंध सादरीकरण केले आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. मंत्री व विधानसभा सदस्य राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, माजी जि.प. अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, युवा नेते मा. खासदार डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे, शिक्षण संचालक श्रीमती लीला सरोदे , महाविद्यालय विकास समितीचे पदाधिकारी, सात्रळ महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. जयश्री सिनगर, उपप्राचार्य प्रो. डाॅ. सोमनाथ घोलप, उपप्राचार्य प्रा.दिपक घोलप, उपप्राचार्य प्रा. घाणे.डी.एन, उपप्राचार्य डॉ. नवले बी. एन., कार्यालयीन अधिक्षक विलास शिंदे, महेंद्र तांबे आदींनी अभिनंदन केले आहे.
लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. प्रदीप दिघे,उपप्राचार्य प्रो. डॉ. रामचंद्र रसाळ, उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब रणपिसे, उपप्राचार्य डॉ.भोसले सर,उपप्राचार्य डॉ. गलांडे मॅडम, राहता महाविद्यालयाचे संचालक डॉ. महेश खर्डे, प्र.प्राचार्य लहारे सर, उपप्राचार्य डॉ सुरेश पुलाटे, प्राचार्य सोपानराव शिंगोटे, डॉ. विजय खर्डे, डॉ. विजय निर्मळ, सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर वृंद यांनी अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या