श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) - कृषी विभागात कृषी सहाय्यक पदावर ४० वर्षे सेवा करुन सेवानिवृत्त झालेले सी. के. भोसले यांनी " मी कृषी सहाय्यक झालो " या पुस्तकाचे प्रकाशन टिळकनगर येथील प्रा विठ्ठलराव दोंड यांचे शेतावर " महाराष्ट्र कृषी भूषण पुरस्कार विजेते " ज्ञानेश्वर माऊली पवार यांचे हस्ते झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक, तथा कामगार संघटनचे नेते अविनाश आपटे काका होते. कृषीभूषण पुरस्कार विजेते माऊली पवार यांनी भोसले यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन शेतकर्यांच्या बांधावर जावून शेतीविषयक मार्गदर्शन केले. अनेक शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले. त्यांना अनेक सामाजिक संस्थाचे पुरस्कार मिळाले आहे. सी. के. भोसले यांनी लिहिलेल्या मी कृषी सहाय्यक झालो या पुस्तकाचे प्रकाशन करताना बोलत होते. अविनाश आपटे यांनी भोसले हे अतिशय कष्टाळू, मेहनत करणारे व आपल्या व्यवसाया प्रती निष्ठा असणारे व्यक्तिमत्व आहे. यापूर्वी देखील त्यांनी शेतकर्यांसाठी म्हणीचे पुस्तक प्रकाशित केलं आहे.
वयाच्या ७८ व्या वर्षी " मी कृषी सहाय्यक झालो " हे पुस्तक लिहून एक आदर्श घालून दिला आहे. या प्रसंगी एकलहरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ. नसीमा भाभी जहागीरदार कृषीविभागाचे बेलसरे, बिबवे, प्रा.विठ्ठलराव दोंड, वाघमारे सर, शिक्षक नेते नवनाथ अकोलकर सर, ज्येष्ठ नागरिक संघटनेचे लक्षण निकम, पत्रकार लालमहमंद जहागीरदार, आबासाहेब साळुंके, रविंद्र देशमुख, शेतकी अधिकारी कोल्हे, अण्णासाहेब वाडकर, रामनाथ कोळपकर, शांताराम वैद्य, शिवाजी दोंड, दत्तात्रय ढोकचौळे, जानराव, दुसिंग, राजू भोसले, अनिल दौंड आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी लक्षण निकम, आबासाहेब साळुंके, बेलसरे, बिबवे, प्रा. दोंडसर, लालमहमंद जहागीरदार, रवी देशमुख, आदिमान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोंड परिवार यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ अकोलकर सर यांनी केले. तर आभार अनिल दोंड यांनी मानले.
0 टिप्पण्या