अहमदनगर/ जावेद शेख : भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्ली अंतर्गत भारतीय फलोद्यान संशोधन संस्था बेंगलोर व उद्यान विद्या परीसंस्थेअंतर्गत कीड व्यवस्थापन संघटना यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पातळीवरील फलोद्यान पीक संरक्षण या विषयावर तीन दिवसाच्या परीसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.
या परिसंवादात देशपातळीवरील विविध संशोधन संस्था, विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांनी सहभाग घेऊन आपले संशोधन पेपर सादरीकरण केले. यावेळी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील उद्यानविद्या विभागातील किटकशास्त्रज्ञ डॉ. अशोक वाळुंज यांना डाळिंबावरील किड व्यवस्थापन या विषयावर सादरीकरणास उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार देण्यात आला. यावेळी सहा तांत्रिक सत्रात प्रत्येकी दोन उत्कृष्ट सादरीकरण पुरस्कार घोषित करण्यात आले.
या प्रसंगी आय.एच.आर. बेंगलोर संस्थेचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. श्रीधर, संचालक डॉ. रेड्डी, डॉ. मूर्ती, आय. सी. ए. आर. चे सहा. महासंचालक डॉ. पांडे, डॉ. दुबे, माजी उपमहासंचालक डॉ. कृष्णकुमार, डॉ. अब्राहीम, डॉ. उमा माहेश्वरी यांनी विविध विषयावर तांत्रिक मार्गदर्शन केले. डॉ. अशोक वाळुंज यांच्या या यशाबद्दल विद्यापीठाचे संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ व सहयोगी अधिष्ठाता (नि.कृ.शि) डॉ. श्रीमंत रणपिसे यांनी अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
0 टिप्पण्या