सेंटल बँक ऑफ इंडियाच्या विविध सामाजिक सुरक्षा योजना

अहमदनगर/ जावेद शेख : सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या विविध सामजिक सुरक्षा योजना व ई श्रम कार्ड नोंदणी याचे शिबिर वांबोरी येथील श्री गोरक्षनाथ दूध संस्थेच्या कार्यालयात सुरू करण्यात आले आहे.

राहुरी कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये याची सुरवात करण्यात आली. यावेळी जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा असे आव्हान उदयसिंह पाटील यांनी केले. प्रधानमंत्री जीवन सुरक्षा, जीवन ज्योती, अटल पेंशन योजना, श्रम कार्ड योजना यांच्यावर विस्तृत माहिती देण्यात आली.

यावेळी सरपंच किरण ससाणे, शामभाऊ पटारे, सारंगधर पटारे, पोपट पटारे, जनार्दन ढोकणे, बाळासाहेब ससाणे, अशोक तुपे, महेश गाडेकर, युसुफ देशमुख, रवी पटारे, सचिन पटारे आदी ग्रामस्थ तसेच सेंट्रल बँकेचे शाखाधिकारी उषा सुपनर, बँक प्रतिनिधी प्रसाद बानकर, महेश नरसाळे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या