प्रहारच्या " दिव्यांग निर्णय " दिनदर्शिकेचे प्रकाशन


राहुरी शहर/ अशोक मंडलिक - दिव्यांगाचे दैवत राज्यमंत्री ना.बच्चू कडू व जिल्हा अध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने "दिव्यांगनिर्णय" या दिनदर्शिकेचे प्रकाशन डॉ शिवशाहीर विजय महाराज तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रहार चे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय महानोर होते. प्रमुख उपस्थिती जिल्हा सचिव हमीदभाई शेख, जिल्हा समन्वयक राजेंद्र पोकळे, नगर चे तालुकाध्यक्ष संजय पुंड, नगर शहर अध्यक्ष संदेश रंपाडिया, जिल्हा संघटक आप्पा गाढे, कार्यकामाचे प्रास्ताविक राहुरी तालुकाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी केले.

या मध्ये दिनदर्शिकेचा मुख्य उद्देश प्रहारच्या माध्यमातून प्रत्येक दिव्यांगांना आपल्या अडचणी, शासनाच्या योजना दिव्यांगां पर्यत पोहचता याव्यात. राहुरी तालुक्यातील दिव्यांगां पर्यत ना. बच्चू कडुंचे विचार पोहचले पाहिजे. दिव्यांगांच्या अडचणी सोडवण्यास मदत होईल प्रहार संघटनेचा वेगवेगळ्या शिबिराच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी साधने पुरवले जातात. त्याच्या अडचणी सोडवल्या जातात. जिल्हा संघटक राजेंद्र पोकळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, राहुरी तालुका प्रहार चे काम खूपच चांगले आहे. चांगले उपक्रम राबवले जातात. दिव्यांगांना मदतीचा हात देतात. त्यांच्या अडचणी सोडवतात. जिल्हा सचिव हमीद शेख यांनी राहुरी तालुका प्रहार चे कौतुक केले.

यावेळी शिवशाहीर विजय महाराज तनपुरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले दिव्यांंगांना स्वावलंबी होण्याची गरज आहे. प्रत्येकाने नवीन वर्षात संकल्प केला पहिजे. आपल्याला या वर्षात कामाचे नियोजन केले पहिजे. रोजगारा माघे धावण्यापेक्षा आपण उद्योजक होऊन रोजगार देण्याचे काम केले पहिजे असे प्रतिपादन महाराजानी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिल्हा समन्वयक अप्पासाहेब ढोकणे यांनी केलेे.

यावेळी तालुका उपाध्यक्ष विठ्ठल पांडे, तालुका सल्लागार सलीमभाई शेख, तालुका सचिव योगेश लबडे, तालुका महिला अध्यक्ष सौ रूपालीताई जाधव, तालुका संघटक भास्कर दरंदले, संघटक तुकाराम बाचकर, संघटक राजु घनवट, राहुरी शहर अध्यक्ष वैभव थोरात, कार्याध्यक्ष संजय देवरे महिला शहराध्यक्ष अनामिका हरेल, देवळाली प्रवरा शहर अध्यक्ष उपाध्यक्ष अनिल मोरे, सचिव सुखदेव कीर्तने, टा.मिया शाखा अध्यक्ष ह.भ.प.नानासाहेब शिंदे, उपाध्यक्ष सुरेश दानवे, कागळे मामा, माहेगाव शाखा अध्यक्ष भरत आढाव, उपाध्यक्ष जगन्नाथ हापसे, बा.नादुर शाखा अध्यक्ष राजेंद्र आघाव, उपाध्यक्ष शिवाजी जाधव, गोटुबेआखाडा शाखा अध्यक्ष दत्तात्रय खेमनर, उपााध्यक्ष आदिनाथ दवणे, ब्राम्हणी शाखाध्यक्ष बाबुराव शिंदे सर, वडनेर शाखा अध्यक्ष दिपक हारदे, वांबोरी शाखाध्यक्ष शशिकांत कुर्हे, सदस्य कृष्णा लुटे, कोल्हार शाखा अध्यक्ष सौ अनुराधा घोडेकर, कनगर शाखा अध्यक्ष अविनाश वरघुडे, विजय केदारी उपस्थीत होते. आभार उपाध्यक्ष विठ्ठल पांडे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या