नांदलगाव येथे पेव्हर ब्लॉक कामाचे भुमिपुजन


पैठण : तालुक्यातील नांदलगाव येथे ग्रामपंचायत मार्फत १५ वा वित्त आयोगामधुन वार्ड क्रमांक १ मध्ये पेव्हर ब्लॉक बसवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या कामाचे उद्घाटन नुकतेच भाजपाचे ढोरकीन सर्कल अध्यक्ष साईनाथ गायके यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष साईनाथ लंभाडे, सरपंच प्रतिनिधी चंद्रकांत चाबुकस्वार, उपसरपंच किशोर शिंदे, मुकेश लंभाडे, दिपक दानवे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या