राहुरी / बाळकृष्ण भोसले - राष्ट्रीय सेवा योजनेच्या श्रमसंस्कार शिबिरातून विद्यार्थ्यांच्या मन मेंदू आणि मनगट यांचा समन्वय साधला गेला पाहिजे. श्रमाचे महत्व वेळीच विद्यार्थ्यांना कळले पाहिजे. श्रमाने माणूस मोठा होतो, श्रम एक सेवा आहे, तेव्हा श्रमाला कमी लेखू नये. विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी व्हावे यासाठी स्वावलंबन शिस्त संस्कार श्रम या मूल्यांची त्यांना शिबिर काळात ओळख करून दिली जाते. स्वावलंबन ह्या बरोबरच सामाजिक समता प्रस्थापित आणि बळकट करण्यास अशा शिबीराचा उपयोग होऊ शकतो असे मत प्रा. दत्ता पाटील यांनी व्यक्त केले.
कोल्हार ता. राहाता येथील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिर तालुक्यातील चिंचोली येथे दिनांक २ ते ८ जानेवारी २०२२ या कालावधीत संपन्न होणार आहेे. शिबिराचे उद्घाटन प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक प्रा. दत्ता पाटील शिरसाठ यांचे प्रमुख उपस्थितीत तर सरपंच गणेश हारदे यांच्या अध्यक्षतेत झाले, प्रसंगी ते बोलत होते.
सरपंच हारदे प्रसंगी म्हणाले की श्रम संस्कारातून विद्यार्थ्याच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास होतो. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिनी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन होते आहे हा एक योगायोग आहे. संस्कारातून विद्यार्थ्यांचे बहुआयामी व्यक्तिमत्त्व घडेल आणि उद्याचा आधुनिक भारतीय नागरिक त्यांच्यातून आकाराला येईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सात्रळ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. जयश्री सिनगर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना म्हणाल्या साऱ्या सावित्रीच्या लेकी केवळ प्रतिमा पूजन आणि जयंती या बंधनात सावित्रीबाईचे कार्य न अडकवता त्यांचे कार्य समाजाच्या शेवटच्या स्तरापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न करण्यासाठी सिद्ध झाले पाहिजे. आता आपले प्रश्न आपण सोडविणे गरजेचे आहे त्यासाठी स्त्रियांनी सक्षम झाले पाहिजे.
प्रसंगी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक संभाजी देवकर, अशोक गागरे, सर्जेराव लाटे, शंकर लाटे, दत्ता पारखे, प्राचार्य डॉ अण्णासाहेब तांबे, संभाजी आरगडे, जि.प.शाळेच्या मुख्याध्यापिका मिनाक्षी पाळंदे, प्राचार्य डॉ. सोपान शिंगोटे तिन्ही शाखांचे उपप्राचार्य, प्राध्यापक प्राध्यापकेतर सेवक विद्यार्थी विदर्यार्थिनी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ . प्रवीण तुपे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन प्रा सौ धिमते यांनी तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य प्रोफेसर डॉ. चंद्रकांत रुद्राक्ष यांनी केले.
0 टिप्पण्या