पद्मश्री स्व. सिंधुताई सपकाळ यांच्या स्मरणार्थ वड झाडांचे वृक्षारोपण

पद्मश्री सिंधुताई सपकाळ अनाथांची आर्दश माता - शिवाजीराजे पालवे

नगर - पद्मश्री स्व. सिंधुताई सपकाळ यांच्या स्मरणार्थ नगर तालुक्यातील सारोळा कासार येथे 21 वड झाडांचे वृक्षारोपण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे.

वड झाडांचे वृक्षारोपण करून श्रद्धांजली अर्पण करण्याच्या कार्यक्रमास सारोळा कासार गावचे उपसरपंच जयप्रकाश पाटील, जिल्हा शिक्षक बँकेचे माजी चेअरमन संजय आप्पासाहेब धामणे, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन व अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहाय्यक सचिव संजय रावसाहेब काळे, कॅप्टन सुभाष ठोकळ, ध्येय मल्टिस्टेटचे गायकवाड साहेब, जय हिंद चे शिवाजीराजे पालवे, शिवाजी गर्जे, समाजसेवक नंदु पालवे, प्रा.शहाजहान तांबोळी, सतीश एकनाथ कडूस, पत्रकार सुनील हारदे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
या आगळ्यावेगळ्या श्रद्धांजली कार्यक्रमातील वृक्षारोपण केलेल्या 21 वडांच्या झाडांमुळे सारोळा कासार गावाला पद्मश्री स्व. सिंधुताई सपकाळ यांची आठवण सदैव राहील. यामुळे गावच्या वैभवात भर पडणार आहे, असे उपसरपंच जयप्रकाश पाटील म्हणाले. वडाच्या विशाल झाडासारखे सिंधुताई सपकाळ यांचे कार्य महान आहे. जय हिंद सैनिक सेवा फौंडेशन अहमदनगरच्या माध्यमातुन वृक्षारोपण चळवळ उभी राहिली आहे. पर्यावरण संतुलनासाठी झाडे लावणे गरजेचे आहे, असे पत्रकार सुनील हारदे म्हणाले. पद्मश्री सिंधुताई सपकाळ या अनाथांच्या आर्दश माता होत्या, असे यावेळी शिवाजीराजे पालवे यांनी प्रतिपादन केले. वृक्षारोपण केलेल्या वड झाडांचे पालकत्व सुनील धामणे व बेंद मळ्यातील तरूणांनी घेतले. 

यावेळी संदीप काळे, संजय जाधव, नागर फौंडेशन रवळगावचे अध्यक्ष वृक्षमित्र रवी गोरे, धनंजय मोकासे, ऋषीकेश अडागळे, सुनील धामणे गुरुजी, ऋषितेज काळे, गोरख काळे, भाऊसाहेब धामणे, सैनिक परिवाराचे मेजर शिवाजी लिंभोरे, ज्ञानदेव काळे, हृतिक काळे, ऋषीतेज काळे, ज्ञानेश्वर धामणे, संजय जाधव, सचिन दहिफळे, सहदेव घनवट, संतोष दिवटे, कचरू शिंदे, जालिंदर दरेकर आदि उपस्थित होते. आभार वृक्षमित्र सचिन कडूस यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या