!! संघर्ष !!

वळलो असेल कधी
पण पळलो नाही...!
छळलो असेल कधी 
पण जळलो नाही...!!
पोळलो असेल कधी 
पण भाळलो नाही...!
खेळलो असेल कधी
पण मळलो नाही...!!
रूळलो असेल कधी 
पण घोळलो नाही...!
पिळलो असेल कधी 
पण गिळलो नाही...!!
खिळलो असेल कधी 
पण मिळलो नाही...!
खळलो असेल कधी 
पण कळलो नाही...!!

 बाळासाहेब भोर
 क्रांतीसेना, संगमनेर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या