गर्जे यांची भारतीय स्थल सेनेत लेफ्टिनेंट पदी निवड कौतुकास्पद -शिवाजीराजे पालवे

अहमदनगर/ जावेद शेख : कोल्हार गावचे सुपुत्र ओंकार अनिल गर्जे यांची भारतीय सेनेत लेफ्टिनेंट पदी निवड झाली. त्या बद्दल जय हिंद सैनिक फौंडेशन व कोल्हेश्वरी ग्रुप अहमदनगर च्या वतिने सन्मान करण्यात आला.

यावेळी जय हिंद चे शिवाजीराजे पालवे, शिवाजी गर्जे, जगन्नाथ जावळे, संजय पाटेकर, मदन पालवे, ॲड पोपट पालवे, ॲड संदीप जावळे, मेजर गणेश पालवे, युवानेते बंटी ढापसेे, युवानेते सुमित बटुळे, समाजसेवक रघुनाथ औटी, ज्ञानदेव औटी आदि उपस्थित होतेे. ओंकार गर्जे यांचे वडिल अनिल गर्जे भारतीय नौसेना मधुन निवृत असुन चुलते ज्ञानदेव गर्जे भारतीय वायुसेने तुन निवृत तर दुसरे चुलते शिवाजी गर्जे भारतीय स्थल सेनेतुन निवृत आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार कोल्हुबाई येथील स्व किसनराव गर्जे यांनी भारतीय सेनेच्या तिन्ही दलात एक एक मुलगा देशसेवेत पाठवणारे जिल्ह्यात पहिले कुटुंब आहे आणी आता ओंकार यांची देखील भारतीय स्थल सेनेत लेफ्टिनेंट पदी निवड झाल्याने ही कौतुकास्पद बाब असल्याचे शिवाजीराजे पालवे यांनी सांगितले.

कोल्हार गावातील व जिल्ह्यातील तरूणांनी ओंकारचा आर्दश घ्यावा अतिशय कमी वयात ओंकर गर्जे भारतीय सेनेत दाखल झाले आहेत. त्या मुळे भविष्यात मोठ्या पदावर जाऊन अहमदनगर जिल्ह्याचे व गावचे नाव मोठ होईल व तरूणांना प्रेरणा मिळेल असे श्री. पालवे म्हणाले. सन्मान केल्याबद्दल ओंकार गर्जे यांनी आभार मानले व येणार्या काळात गावातुन व जिल्ह्यातुन जास्तीत जास्त सैन्यात अधिकारी करण्यासाठी मार्गदर्शन करणार असल्याची ग्वाही दिली. सर्व मान्यवरांनी सुभेच्छा देऊन अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या