देवळाली प्रवरा नगर पालिका कामगारांना अग्निसुरक्षा यंञनेचे प्रशिक्षण

देवळाली प्रवरा/ राजेंद्र उंडे : अग्निसुरक्षा यंञना कार्यालयात उपलब्ध असतानाही तिचा वापर कसा करायचा याची माहिती अनेक कर्मचाऱ्यांना नसते त्यामुळे अग्निसुरक्षा यंञना कशी वापरायची याचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. शहरातील नागरीकांनाही अग्निसुरक्षा यंञनेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे मुख्याधिकारी अजित निकत यांनी सांगितले.

देवळाली प्रवरा नगर पालिकेच्या आवारात ऐ.बी.सी.डी हि अग्निसुरक्षा यंञना आग लागल्यावर कशी वापरायची याचे कामगारांना प्रशिक्षण व प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी अजित निकत यांनी अग्निसुरक्षा यंञणेच्या प्रशिक्षण बाबत माहिती देवून अग्निसुरक्षा यंञणा उपलब्ध असेल अग्निबंब घटनास्थळी येवू पर्यंत आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निसुरक्षा यंञनेचा वापर केला पाहिजे, असे मुख्याधिकारी निकत यांनी सांगितले.

यावेळी अग्निशमन कर्मचारी भारत साळूंखे यांनी विविध प्रकारच्या आगी बाबतीत माहिती दिली. अग्निसुरक्षा यंञनेचा आग विझवण्यासाठी वापर केला पाहिजे. परंतू अनेक कार्यालयात अग्निसुरक्षा यंञना भिंतीवर लटकलेली दिसते. परंतू तिचा वापर कसा करायचा याची माहिती नसल्याने हे साहित्य तसेच पडून राहते. कर्मचाऱ्यांना अग्निसुरक्षा यंञनेची माहिती व्हावी यासाठी प्रशिक्षण व प्रात्यक्षिक दाखविण्यात आले आहे, असे साळूंखे यांनी सांगितले.

यावेळी कार्यालयीन विभाग प्रमुख व कर्मचारी संभाजी वाळके, सुदर्शन जवक, मनोज पापडीवाल, संतोष औसरकर, नानासाहेब टिक्कल, अंबादास अटक, सोमनाथ सूर्यवंशी, मुकुंद मुसमाडे, राजेंद्र कदम, अशोक जाधव, ज्ञानदेव शेटे, सुदाम कडू, अमोल पंडित, राजेंद्र चव्हाण, रोहित पंडित, उदय इंगळे, सागर सोनवणे, भाऊसाहेब बर्डे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या