बार्शी गेवराई येथे नाला खोलीकरण कार्याचा शुभारंभ

विलास लाटे : शेतीसाठी व विहिरीमध्ये पाणी पातळीची वाढ व्हावी यासाठी पैठण तालुक्यातील गेवराई बार्शी येथे नाला खोलीकरण करून गाळ काढण्याच्या कार्याचा शुभारंभ करण्यात आला. मानसूनी दास प्रकल्पांतर्गत औरंगाबाद डायोसीजन सोशल सर्विस सोसायटीच्या वतीने पोकलेन मशीन उपलब्ध करण्यात आली असून याद्वारे नाला खोलीकरण करण्यात येत आहे.

गाळ काढून नाला खोलीकरणामुळे आसपासच्या शेतकऱ्यांना याचा भरपूर फायदा होईल असा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. नाला खोलीकरणामुळे विहिरीतील पाणी पातळी मध्ये लक्षणीय वाढ होण्यास मदत होईल. यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साह व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष बिशप अंब्रोज रिबेलो, संचालक फादर संजय पारखे, सिस्टर बिनु, सरपंच सखाराम वाघ, रवींद्र खुटेकर, ग्रामसेवक एचडी सोळवे, भाऊसाहेब काकडे, बाबासाहेब ईश्वर, अरुण गिरी, साईनाथ काकडे, दगडू काकडे, अर्चना काकडे, जनाबाई मिसाळ, कुसुमबाई गिरी, सविता काकडे, जनाबाई वाघ, जमुना तुपे, सचिन गोरे व शांतीलाल राठोड आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या