सावित्रीबाई फुले यांच्या शिदोरीचा उपयोग सामाजिक कार्यासाठी केल्यास देशाचा विकास- डॉ. प्रमोद रसाळ

राहुरी शहर/अशोक मंडलिक : सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या शिदोरीचा विद्यार्थ्यांनी जिवनात आत्मसात करून सामाजिक कार्यासाठी उपयोग केल्यास देशाचा विकास होण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभेल असे प्रतिपादन डॉ. प्रमोद रसाळ यांनी व्यक्त केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सावित्रीबाई फुले प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले यांची 119 व्या जयंती साध्या पद्धतीत साजरी करण्यात आली. यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद रसाळ यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी इयत्ता अकरावी बारावी विद्यार्थ्यांना कोरोना चे लसीकरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुमारी तनिष्का तागड या विद्यार्थिनीने राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धा स्पर्धेत देशामध्ये द्वितीय क्रमांक मिळून सिल्वर पदक प्राप्त केल्याबद्दल डॉ. प्रमोद रसाळ व डॉ. महानंद माने यांच्या हस्ते तिला सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. महानंद माने, खजिनदार महेश घाडगे, विद्यालयाचे मुख्याध्यापिका आशाताई धनवटे, प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक भाऊसाहेब दाते, इंग्लिश मिडीयमचे मुख्याध्यापिका जोशी मॅडम, उपमुख्याध्यापक नंदकुमार मुळे, क्रीडा अधिकारी समसुद्दिन इनामदार, प्रा. जितेंद्र मेटकर, दशरथ दळवी, बाळासाहेब डोंगरे, अरुण तुपविहीरे, बाळासाहेब खेत्री, क्रीडाशिक्षक घनश्याम सानप, श्रीमती अनघा सासवडकर, श्रीमती सुरेखा आढाव, गोरक्षनाथ उचाळे, श्रीमती सविता साळवे, सुरेश गव्हाणे व इतर शिक्षक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या