राहुरी : प्रजासत्ताक दिनानिमित्त व्हाईट कपड्यांचे दालन असलेल्या सरपंच द व्हाईट हाऊस कडुन कपड्यांच्या खरेदीवर भरघोस सुट देण्यात येणार आहे.
देशाचा प्रजासत्ताक दिन हा २६ जानेवारी रोजी साजरा केला जातो. त्यामुळे सरपंच द व्हाईट हाऊस कडून आपल्या ग्राहकांसाठी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून एक खास व अनोखी संकल्पना राबविण्यात येणार आहे. या संकल्पनेतून व्हाईट कपड्यांच्या प्रेमींसाठी व्हाईट कपड्यांच्या असंख्य व्हरायटीच्या खरेदीवर २६ टक्के सवलत दिली जाणार आहे.
सरपंच द व्हाईट हाऊस या व्हाईट कपड्यांच्या दालनाची सुरुवात ही १८ जानेवारी २०२१ रोजी राहुरी येथे करण्यात आली होती. या १८ जानेवारी रोजी या दालनास एक वर्ष पूर्ण होत आहे. या दालनाच्या यशस्वी वाटचालीनंतर श्रीरामपुर मध्ये सरपंच द व्हाईट हाऊसच्या शाखेची स्थापना करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या ऑफरमध्ये खादी, कॉटन, लिनेन, रेडीमेड, कुर्ता असे प्रकारचे कपडे पाहण्यास मिळणार आहेत. ही ऑफर २५, २६ व २७ जानेवारी या कालावधीसाठी असणार आहे. तरी या ऑफरचा लाभ व्हाईट प्रेमींनी राहुरी येथील नगरपालिका कॉम्प्लेक्स नविपेठ व श्रीरामपूर येथील केशरप्रेम कॉम्प्लेक्स मेन रोड या दालनांना भेट देऊन घ्यावा, असे आवाहन सरपंच द व्हाईट हाऊस चे प्रोप्रा. म्हसे पाटील, संपर्क क्र.- ९८३३७००३०१ यांनी केले आहे.
0 टिप्पण्या