सर्वसामान्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्नशील - अशोक कानडे

राहुरी / बाळकृष्ण भोसले - सर्व सामान्य जनतेला शासनाच्या सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत व पुढील काळात नियमितपणे मतदारसंघातील प्रत्येक कामगारांपर्यंत सर्व त्या योजनांचा फायदा पोहचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन श्रीरामपूर मतदार संघाचे आमदार लहु कानडेंचे बंधू अशोक कानडे यांनी केले.

संजयनगर येथे ईदगाह परिसर या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या श्रीरामपूर तालुका असंघटीत कामगार आघाडी यांचे वतीने सातव्यांदा असंघटित बांधकाम कामगारांना ४० सुरक्षा कीट साहित्य पेट्यांचे वितरण करण्यात आले, त्या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे आयोजन श्रीरामपूर तालुका अध्यक्ष इम्रानभाई शेख, शहराध्यक्ष जाकिरभाई शेख, संतोष निकम, भैय्या भाई शाह यांनी केले.

प्रसंगी असंघटित कामगार आघाडीचे राहाता तालुका अध्यक्ष निर्मळ, प्रदेश सचिव व जळगाव जिल्हा प्रभारी अक्षय पाटील नाईक, भैय्या( रऊफ)शाह, एकता सोशल ग्रुपचे अध्यक्ष जमीर भाई, संतोष निकम, साजिद शेख, अनिल हिवराळे, शाहरुख शाह, अजिंक्य ससाने, संतोष हिवराळे, जावेद शेख, इरफान शेख, समद शेख, अहमद शेख, कृष्णा जाधव, बाबा पेंटर, उपाध्यक्ष मन्यार साहेब, इंजि. ईर्षान पठाण, इंजि. फिरोज शेख आदी मान्यवरांच्या हस्ते साहित्य किटचे वाटप करण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या