अवैध वाळू चोरीच्या आरोपातून डंपर चालकाची निर्दोष मुक्तता

राहुरी / बाळकृष्ण भोसले - तालूक्यातील मौजे मोकळ ओहळ गावाच्या शिवारात ब्राम्हणी ते वांबोरी रोडवर आरोपी याने त्याचे ताब्यातील डंपर मध्ये विना परवाना बेकायदा वाळू चोरलेच्या आरोपातून आरोपी रावसाहेब विजय देठे याची राहूरी येथील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. 

या प्रकरणी सविस्तर हकिकत अशी कि, मोकळ ओहळ शिवारात वांबोरी रोडवर दि ३०/१०/१४ रोजी आरोपी याने डंपर क्रमांक एम.एच.१६ एई २४९४ यामध्ये विनापरवाना बेकायदा सुमारे ४ ब्रास वाळू अंदाजे किंमत १२ हजार रुपये किमतीची स्वतःचे फायद्याकरीता चोरुन घेउन जात असताना मिळून आला म्हणून आरोपी विरुद्ध राहूरी पोलिसांनी सि .आर.I- ३२८/२०१४ नुसार भारतिय दंड विधान ३७९ व भारतीय गौण खनिज कायदा ३१५ प्रमाने गुन्हा दाखल केला व सदर गुन्ह्याचा तपास करुन तपासी आधिकाऱ्याने दोषारोपपत्र राहूरी येथिल न्यायालयात पाठविले.

राहूरी न्यायालयात दोषारोप क्रमांक आर. सी.सी. नं २१८ /२०१४ हा खटला राहूरी येथील न्यायाधिश एम.पी.मथुरे साहेब यांचे समोर चालला फिर्यादी च्या वतिने साक्षिदार तपासले गेले व सबळ पुराव्या अभावी मा. न्यायालयाने आरोपी याची प्रस्तूत खटल्यातून दि २७/०१/२०२२ रोजी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्या वतिने जेेष्ठ विधिज्ञ व नोटरी पब्लिक प्रकाश एम.संसारे यांनी काम पाहिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या