शेळके यांना पुन्हा तहसीलदार या पदावर नियुक्ती करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


फोटो : रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांना तालुक्यातील नागरिक निवेदन देताना.






पैठण तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीसह संघटनेची मागणी

पाचोड : पैठण येथील तहसिलदारावर काही दिवसापूर्वी गंगापुर तालुक्यातील वाळूतस्करांनी पूर्ववैमनस्यातून यांच्या विरोधात लाच लुचपत विभागाकडे तक्रार होती. त्यामुळे या विभागाकडून कारवाई करण्यात आली होती. मात्र, शेळके यांनी थोड्याच कालवधीमध्ये तालुक्यातील शेकडो प्रश्न सोडविले असल्याने त्यांना पुन्हा पैठण येथे तहसीलदार या पदावर नियुक्ती करण्यासाठी विविध संघटनेकडून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन दिलेली आहे.

    मात्र, फेब्रुवारी 2020 पासून तहसीलदार या पदावर चंद्रकांत शेळके यांची नियुक्ती झालेली आहे. त्यांनी रुजू झाल्यापासून पैठण तालुक्यातील सर्वसामान्य जनतेसाठी अनेक लोकोपयोगी कामे केलेली आहेत. काही दिवसापूर्वी गंगापुर तालुक्यातील वाळूतस्करांनी पूर्ववैमनस्यातून शेळके यांच्या विरोधातक्रार केली. तथापि पैठण तालुक्यातील सर्वसामान्य जनता आणि महिला वृद्ध यांच्या प्रतिक्रियांची दखल घेतली असता असे निदर्शनास येत आहे की तहसीलदार शेळके यांनी त्यांच्या कालावधीत सुमारे शंभर किलोमीटर शेतरस्ते मोकळे झालेले आहेत. ज्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली रस्त्याची कामे पूर्ण झालेली आहेत. अनेक शेतकऱ्यांची रस्त्याची कामे असतील अथवा इतर अडचणी असतील त्या तात्काळ सोडविण्याबाबत चंद्रकांत शेळके यांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येते. 

    आजही ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता आमच्याकडे भावना व्यक्त करतात कि, शेळके यांना तात्काळ पैठणचा पदभार दिल्यास त्यांची कामे प्राधान्याने मार्गी लागतील. शिवाय शेळके हे सर्वसामान्य जनता अथवा इतर कोणीही यांना मोबाईल द्वारे तात्काळ कायदेशीर मदत करतात, सल्ला देतात. इतर विभागात जर जनतेची कामे प्रलंबित असतील तर विभागप्रमुखांना तात्काळ फोन करून कायदेशीर कामे पूर्ण करून देण्याबाबत आग्रह धरतात. शेतरस्ते असतील शासकीय अनुदाने असतील अथवा इतर कामे असतील याबद्दल तात्काळ दखल घेणारे तहसीलदार अशी शेळके यांची ओळख आहे. त्यांना मूळ पदावर कायम नेमणूक देण्याबाबत पैठण तालुक्यातिल मुरमा ग्रामपंचायत, विहामांडवा ग्रामपंचायात, चांगतपुरी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद सदस्य विहामांडवा पल्लवी नवथर यांच्यासह आदी गावातून रोहयो मंत्री संदीपान भुमरे तसेच विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना वेगवेगळ्या गावातून निवेदन जात असून त्यांच्यावर दाखल केलेला गुन्हा रद्द करून पुन्हा पैठणला नियुक्ती करावी यासाठी विविध संघटना, विविध ग्रामपंचायतींनी लेखी मागणी केलेली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या