लोणी खुर्द विविध कार्यकारी सेवा संस्थेत प्रभाताई घोगरे यांचा सत्कार

लोणी : राहाता तालुक्यातील लोणी खुर्द ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत दैदीप्यमान विजय संपादन केल्याबद्दल लोणी खुर्द विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या आमदार चंद्रभान दादा घोगरे पाटील सभागृहात सत्कार करण्यात आला.

मंगळवारी सकाळी १० वाजता संस्थेच्या वतीने जेष्ठ सभासद आबासाहेब आहेर यांच्या अध्यक्षतेखाली सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना प्रभाताई म्हणाल्या, आपल्या सहकारी संंस्थेचे संस्थापक स्वर्गीय चंद्रभान दादांनी मुहूर्तमेढ रोवुन आज पंच्याहत्तर वर्ष झाली. ऐवढी वर्ष ही कामधेनु या गावाच्या सभासद, शेतकरी यांच्या सेवेत अविरतपणे कार्य करत आहे, याचा मला अभिमान वाटतो. यापुढे या सहकारी संस्थेच्या माध्यमातून महिलांचे जाळे निर्माण करुन सभासद महिलाकरिता विविध योजना राबविण्याचा मानस असुन आपली संस्था शेतकर्‍याची कामधेनु असुन संस्थेच्या शेतकरी सभासदांच्या हित जोपासण्यासाठी सर्वतोपरीने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


यावेळी सरपंच जनार्दन घोगरे यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या जुन्या कारभाराला उजाळा देत संस्थेस गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी संस्थेच्या नियंत्रणाखाली अल्प दरात शेतकरी, सभासद यांच्यासाठी माल डेपो, किराणा माॅल, कृषी सेवा केंद्र सुरु होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कार्यक्रमानंतर संस्थेच्या सुरु असलेल्या गोडाऊन च्या दुरुस्तीची पाहणी सभासदांसमवेत कृषीभुषण प्रभाताई व सरपंच जनार्दन घोगरे यांनी केली.

यावेळी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस श्रीकांत मापारी, संस्थेचे संचालक अनिल आहेर, भास्कर आहेर, विलास घोगरे, आप्पासाहेब घोगरे, कैलास आहेर, दिपक घोगरे, बाळासाहेब कुरकुटे, चांगदेव गावकरी, संजय आहेर, रणजित आहेर, बाबासाहेब ढोबळे, हारीभाऊ घोगरे,दिनकर आहेर, प्रभाकर आहेर संस्थेचे सचिव सोमा पवार, चंद्रशेखर कोते, सतिश पवार यांच्यासह सभासद उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या